Homeताज्या बातम्याफीचर

बी क्रिएटिव्ह !

हल्ली आपण जास्त करुन लोकांना बोलताना ऐकतो, की.. "जीवनात काही रसच राहिला नाही", "नुसताच दिवस सुरु होतो आणि संपतो", "सर्व तेच तेच सुरु आहे", "जीवना

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
वादळी वार्‍याने आनंददायी माध्यमिक निवासी आश्रमशाळेचे पत्रे उडाले; लाखो रुपयांचे नुकसान
“नेमके खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही”

हल्ली आपण जास्त करुन लोकांना बोलताना ऐकतो, की.. “जीवनात काही रसच राहिला नाही”, “नुसताच दिवस सुरु होतो आणि संपतो”, “सर्व तेच तेच सुरु आहे”, “जीवनातला आनंद निघूनच गेलाय”वैगरे.. वैगरे.. तर असे का होत आहे? जीवनात इतके काही असून सुद्धा  का लोकांच्या जीवनातला रस निघून गेलाय? कारण आपण जीवनाला नाही तर पैश्यांनाच जास्त महत्व देवून बसलो आहोत. पैसे हे एक चांगले जीवन जगण्यासाठी महत्वाचे आहेच, पण पैसे म्हणजेच जीवन नाही.. ब्रँडेड कपडे, ब्रँडेड वस्तू, ब्रँडेड कार, महागडा मोबाईल, मोठा फ्लैट, वेल सेटल्ड़ लाईफ या सर्व गोष्टीं मिळवण्यासाठी प्रत्येक माणूस अहोरात्र प्रयत्न करत असतो, आणि या सर्व, निर्जिव वस्तू आहेत.. मग यामध्ये जीवन कसं असेल. म्हणून या सर्व वस्तू मिळवून सुद्धा माणूस दु:खीच असतो, आणि दुसरे म्हणजे या सर्व गोष्टी अजून नाही मिळाल्या म्हणून रडत असतो. हे पैसे कमावण्याच्या नादात, माणूस असे काम करत आहे जे त्याला आवडतही नसेल. पण नाईलाजाने त्याला ते करावेच लागते. तसेच एखादे आवडणारे काम असेल तरी त्यामध्ये सुद्धा पैसे कमावण्याची मारामारी असतेच शिवाय माणसाला पैश्यांसाठी तेच तेच काम नाईलाजाने करावे लागते. आणि म्हणूनच माणसाचे जीवन तेच तेच होवून जाते. म्हणून जीवनात त्याला काही वेगळे दिसत नाही, त्याच त्याच जीवनाचा कंटाळा येतो.. या पृथ्वीवर जो निसर्ग आहे, जे खरे जीवन आहे ते प्रत्येक क्षणांत बदलत आहे, आणि याच बदलणा-या जीवनाचा भाग माणूस. नेहमीचेच तेच-तेच काम करत आहे. आता जीवन बदलणे किंवा वेगळे काम करणे म्हणजे नक्की काय? तर सगळे सोडून देणे? आणि मनाला वाटेल ते काम करणे? मनाला वाटेल तसे वागणे?

तर असे अजिबातच नाही. पैस्याला आपल्या जीवनात फार महत्व आहे, म्हणून जे नावडीचे काम किंवा तेच तेच काम आहे ते करावेच लागेल.. पण दिवस भरात.. कमीत कमी एक तास तरी, असे काही करु शकतो, जे आधी कधीच केले नसेल..जे करण्यासाठी मनामध्ये फार उत्सुकता असेल..जे करायची अर्थातच आवड असेल जे केल्याने मन प्रसन्न होईल..कमीत कमी असे एक काम जरी दिवसातून एकदा केले, तरी अक्खा दिवस अप्रतिम जाईल..या वेळेत आज काहीतरी नवीन केले, आता उद्या अजून काहीतरी नवीन कर आणि या गोष्टीमुळे आधीसारखा तोच-तोच पणा, कंटाळा वाटणार नाही. उलट आज नवीन काहीतरी केले, नवीन काहीतरी शिकलो, एका नवीन गोष्टीचा अनुभव घेतला असे निश्चितच वाटू लागेल.

 माणसाने असे एखादे इंटरेस्टींग 

काम, त्यातून काय मिळेल हे न बघता आवडीने मनापासून केले.. तर त्याला क्रिएटिव्ह होण्यापासून कोणी अडवू शकणार नाही, आणि निसर्ग हा दररोज बदलून क्रिएटिव्ह असण्याचीच साक्ष देतो आहे मग या जीवनाचाच भाग माणूस कसा क्रिएटिव्ह नसू शकतो. म्हणून प्रत्येक माणूस हा क्रिएटिव्ह च असतो, फक्त त्याने रोजच्या जीवनातून डोके वर काढून जराशी स्वत: ची नजर बदलयची गरज आहे आणि असे रोज एखादे नवीन काम माणूस करु लागला, त्या नवीन कामाचा अनुभव घेवू लागला मग माणसाला त्याचे रोजचे, तेच-तेच जीवन किती इंटरेस्टिंग किती वेगळे वाटेल हे त्याचे त्यालाच समजायला लागेल आपले जीवन हे प्रत्येक क्षणांत बदलत आहे म्हणून आपणही आपल्या आयुष्यात थोडे तरी बदलत रहायलाच हवे.

योगेश रोकडे  निवासी संपादक , नाशिक  ९४२२८९२१९८

COMMENTS