Homeताज्या बातम्यामनोरंजन

लगान चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस यांचे निधन

हिंदी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध जेष्ठ सिनेमॅटोग्राफर गुरूराज जोइस यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अ

फेसबुक-इन्स्टावर ब्लू टीकसाठी पैसे
वीजचोरीप्रकरणी पश्‍चिम महाराष्ट्रात 7 हजारांवर आकडे जप्त
सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर अजित पवार गटाचा सवाल?

हिंदी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध जेष्ठ सिनेमॅटोग्राफर गुरूराज जोइस यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बंगळुरू येथे २७ नोव्हेंबरला त्यांना हृदविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. गुरूराज जोइस यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. गुरूराज जोइस यांच्या पाश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. गुरूराज जोइस हे हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात मोठे नाव आहे. ते प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर होते. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले आहे. आमिर खानच्या लगान चित्रपटासह त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांसाठी काम केले आहे. अप्रतिम कॅमेरा वर्कसाठी ते ओळखले जात होते. गुरूराज जोइस यांच्या निधनाचे वृ्त्त कळताच आमिर खानच्या आमिर खान प्रोडक्शनकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, गुरूराज जोईस यांनी सहाय्यक सिनेमॅटोग्राफर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले होते. गुरुराज यांनी ‘मुंबई से आया मेरा दोस्त’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’, ‘मिशन इस्तंबूल’, ‘एक अजनबी’, ‘जंजीर’ आणि ‘गली गली चोर है’ या चित्रपटांमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले होते.

COMMENTS