मुंबई ः आमदार अपात्रता याचिकेची सुनावणी गुरूवारी तिसर्या दिवशीही सुरू होती. मात्र तिसर्या दिवशी या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षकारांच्या वकिलांम
मुंबई ः आमदार अपात्रता याचिकेची सुनावणी गुरूवारी तिसर्या दिवशीही सुरू होती. मात्र तिसर्या दिवशी या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षकारांच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाल्याचे बघायला मिळाले. या दोन्ही वकिलांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तंबी दिली. दोन्ही पक्षकार वकील युक्तीवाद करताना विनाकरण वाद करत आहे यामुळे वेळ वाया जातो. मला निश्चित वेळेत या प्रकरणाचा निकाल लावायचा आहे. परंतु तुमच्या वादामुळे सुनावणीला वेळ लागत आहे. मी हे रेकॉर्डवर घेईल आणि हे मला सर्वोच्च न्यायालयात सांगावे लागेल, असा इशारा विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना दिला.
ठाकरे गटाचे नेते सुनिल प्रभूची गुरूवारी पुन्ही उलट तपासणी करण्यात आली. व्हीप बजावण्यावरून शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. व्हीप बजावण्यावरून जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. प्रभू यांनी आमदारांना बजावलेला व्हिप हा कसा खोटा आहे, याची बाजू जेठमलानी मांडत आहेत. त्यावर अक्षय कामत यांनी जेठमलानी यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला. यानंतर दोघांमध्ये खडाजंगी झाली. या दोन्ही वकिलांच्या खडाजंगीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली. या वादामुळे सुनावणीला उशीर होत असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.
या सुनावणीच्या वेळी शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना सवाल केला की,आमदार निवासातील किती लोकांना व्हीप बजावण्यात आला. यावर उत्तर देतांना प्रभू म्हणाले की, किती लोकांना आमदार निवासात नेऊन दिला हे मला आठवत नाही. पण आमदार निवास आणि काही लोकांना ते आहे तिथे नेऊन दिला होता हे मला आठवते. यानंतर जेठमलानी म्हणाले की, तुम्ही प्रत्यक्षात जाऊन व्हीप नेऊन दिला नाही. त्यामुळे तो दिला असं कोणत्या आधारे म्हणता?यावर उत्तर देतांना प्रभू म्हणाले की, मी सही करून व्हीप काढतो आणि तो नेऊन देण्याची व्यवस्था करतो. ज्यांना सर्व झाला, मिळाला त्यांच्या सह्या आहेत यावरून मला कळले. त्यांच्या सह्या आमच्या दप्तरी पक्ष अॅाफिसमध्ये आहेत. यावर जेठमलानी म्हणाले की, माझे तुम्हाला सांगायचे आहे की, असा कुठलाही रेकॅार्ड नाही. त्यामुळे तुम्ही तो कोर्टात सादर केलेला नाही. यावर प्रभु म्हणाले की, हे खोटे आहे. यावर आक्षेप घेत जेठमलानी म्हणाले, तुम्ही 37 च्या उत्तरात असे म्हणाला की, जे लोक संपर्कात नव्हते त्यांना आम्ही व्हॉट्सअप मेसेज पाठविण्याशिवाय पर्याय नव्हता. यातून आपल्याला असे म्हणायचे आहे का की तुम्ही व्हॉट्सअपवरून पाठविणे योग्य आहे. जे लोक हे बरोबर आहे. यानंतर दोन्ही पक्षकांराच्या वकीलांमध्ये खडाजंगी झाल्याचे बघायला मिळाले.
सुनील प्रभूंची विधानसभा अध्यक्षांविरोधात तक्रार – आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेत असून, याप्रकरणी पक्षपातीपणा, वेळकाढूपणा करत आहेत अशी तक्रार ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करणारे पत्र प्रभूंनी विधानभवनाला लिहिले आहे. अध्यक्ष शिंदे गटाला झुकते माप देत आहेत, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. साक्ष, पुरावे, प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ठराविक वेळ दिलेली असतानाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गटाला वाढीव वेळ देत कारवाई लांबवत आहेत असे या पत्रात म्हटले आहे.
COMMENTS