Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

पंढरपुर प्रतिनिधी - कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आज गुरुवारी पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी

महायुतीचे अन्यायी सरकार खाली खेचा
‘व्यंकटेशा’! अधिकार्‍यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केव्हापासून ?
रेणापूर बाजार समिती लातूरप्रमाणे विकसित करणार

पंढरपुर प्रतिनिधी – कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आज गुरुवारी पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक संपन्न झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला गावच्या बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे या वारकरी दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून सुमारे चार ते पाच लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरी नगरी विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे.चंद्रभागा स्नानासाठी चंद्रभागेचा तीर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. दरम्यान यंदा राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आणि विविध समाजांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे काही प्रमाणात भाविकांची संख्या घटली आहे

महापूजेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल मंदिराच्या संवर्धन व सुशोभीकरण कामाचे‌ भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पहिल्या टप्प्यातील कामासाठी 26 कोटी 44 लाख रुपयांचा धनादेश मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आला. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांची गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत बारी गेली आहे. मुखदर्शनासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

.

COMMENTS