Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉस’ फेम शहनाज गिल रुग्णालयात दाखल

मुंबई प्रतिनिधी - बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिलला नुकताच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान अभिनेत्रीला फुड इन्फेक्शन झाल्यामुळे तिला

शहनाजला भेटून फॅन झाली भावुक.
सिंहाला रुममध्ये पाहून शहनाझ गिलची उडाली घाबरगुंडी
अन् शहनाझ गिलला चाहतीनं थेट गुडघ्यावर बसून दिली अंगठी

मुंबई प्रतिनिधी – बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिलला नुकताच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान अभिनेत्रीला फुड इन्फेक्शन झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केलं आहे. शहनाजने हॉस्पिटलमधून व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपली हेल्थ अपडेट दिली आहे. अभिनेत्रीला अचानक रुग्णालयात दाखल करायला लागल्यामुळे सध्या तिचा चाहतावर्ग चिंतेत आहे. शहनाज गिल नुकतीच करण बुलानी दिग्दर्शित ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिला सॅन्डविच खाल्ल्यामुळे ही विषबाधा झाल्याची अभिनेत्रीने इन्स्टाग्राम लाईव्ह करत माहिती दिली. सध्या अभिनेत्रीची प्रकृती स्थिर असून तिची तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करीत आहेत. शहनाज गिलने हॉस्पिटलमधून इन्स्टाग्राम लाईव्ह केलं होतं. यावेळी अभिनेत्री लाईव्हमध्ये म्हणाली, “सर्वांवरच वेळ येते….आता माझ्यावर वेळ आली आहे. सध्या माझी प्रकृती स्थिर आहे. सॅन्डविच खाल्ल्यामुळे मला विषबाधा झाली होती.” शहनाजचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. याआधी सुद्धा बिग बॉस फेम जस्मिन भसीनला फुड पॉईझन झाल्याची बातमी झाली होती. तिला फुड पॉईझन झाल्याची माहिती मिळताच, तात्काळ तिने रुग्णालयात धाव घेतली.

COMMENTS