Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्ग राहणार पाच दिवस बंद

मुंबई/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्ग दोन टप्प्यात पाच दिवसांसाठी हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान

समृद्धी महामार्गाच्या बोगद्याखालील रस्त्यांची उंची वाढवावी – परजणे
समृद्धी महामार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक
समृद्धी महामार्गावर विश्रांतीसाठी कुठे थांबावे

मुंबई/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्ग दोन टप्प्यात पाच दिवसांसाठी हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान हा मार्ग बंद ठेवला जाणार आसल्याने बंद काळात या मार्गावरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अतिउच्च दाब वाहिनीच्या टॉवरच्या कामासाठी जालना ते सावंगीदरम्यान समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 10 ते 12 ऑक्टोबर आणि 25-26 ऑक्टोबर या पाच दिवसांत दुपारी 12 ते 3.30 या वेळेत या टप्प्यात समृद्धी महामार्गावरून कोणतीही वाहतूक होणार नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली.

असा असेल पर्यायी मार्ग – नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक : जालना इंटरचेंज – निधोना एमआयडीसी – जालना महामार्गावरून – छत्रपती संभाजीनगर – केंब्रिज शाळा – उजवीकडे वळून – सावंगी बायपास – सावंगी इंटरचेंज – शिर्डीकडे. शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक : सावंगी इंटरचेंज – जालना महामार्गावरून – विरुद्ध दिशेने निधोना जालना – समृद्धी महामार्गावर प्रवेश करून नागपूरकडे.

COMMENTS