उंब्रज भागात अवैद्य धंदेवाल्यांना पोलिसांचा धसका: कालगाव येथे पावणेदोन लाखाचा दारूसाठा जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उंब्रज भागात अवैद्य धंदेवाल्यांना पोलिसांचा धसका: कालगाव येथे पावणेदोन लाखाचा दारूसाठा जप्त

कालगांव, ता. कराड येथे उंब्रज पोलिसांनी अवैद्य दारू साठ्यावर धाड टाकून 70 दारूचे बॉक्स किंमत सुमारे पावणे दोन लाख रुपये अवैद्य दारू साठा जप्त केला.

मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही : ना बाळासाहेब थोरात
संघराज्य व्यवस्था मोडीत काढण्याचा मोदींचा डाव : पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

मसूर / प्रतिनिधी : कालगांव, ता. कराड येथे उंब्रज पोलिसांनी अवैद्य दारू साठ्यावर धाड टाकून 70 दारूचे बॉक्स किंमत सुमारे पावणे दोन लाख रुपये अवैद्य दारू साठा जप्त केला. रविवार, दि. 11 रोजी विक्री करण्याच्या उद्देशाने आणलेल्या देशी दारूचा अवैद्य साठा केलप्रकरणी धीरज शंकर पवार (रा. कालगाव, ता. कराड) व तानाजी बाबुराव हावळे (रा. हावळे, ता. पाटण) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, उंब्रज पोलीस स्टेशनचे सपोनि अजय गोरड यांना गोपनीय माहिती मिळाली होती. कालगाव, ता. कराड येथे प्रवीण नानासो पवार यांच्या घराच्या आडोशाला तानाजी बाबुराव हावळे हा अवैध दारू विक्री करत आहे. त्यासाठी अवैद्य दारू साठा करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्राप्त गोपनीय माहितीनुसार उंब्रज पोलीस स्टेशन टिमने मौजे कालगाव, ता. कराड येथे अवैध दारू साठ्यावर धाड टाकली. त्या ठिकाणी तानाजी हावळे हा दारु विक्री करत असताना मिळून आला. तसेच त्या ठिकाणी देशी दारूचे 70 बॉक्स किंमत 1 लाख 74 हजार 720 रूपये जप्त करण्यात आले.

या प्रकरणी धीरज शंकर पवार (वय 23, रा. कालगाव) व तानाजी बाबुराव हावळे (वय 41, रा. हावळे, ता. पाटण) यांच्याविरोधात दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार भोसले करत आहेत.  

अवैध दारु साठ्याबाबत व अवैध दारू विक्रीबाबत माहिती असल्यास उंब्रज पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन सपोनि अजय गोरड यांनी केले आहे. उंब्रज परिसरात गुन्हेगार, अवैध धंद्याबाबत कायद्याचा वचक निर्माण झाला आहे. बेकायदा धंदेवाल्यांनी पोलिसांची चांगलीच धास्ती घेतली आहे.

COMMENTS