Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षण कोर्टाची की सरकारची जवाबदारी : बाळासाहेब दोडतले

शासन निर्णयाची केली होळी : धनगर आरक्षण आंदोलन चिघळले

जामखेड/प्रतिनिधी ः सरकारचे वागण्यात आणि बोलण्यात फरक आहे, त्यात विश्‍वासार्हता वाटत नाही, मग आणखी दोन महिन्यांचा वेळ द्यायचा कसा असा प्रश्‍न उपोष

सैराटच्या प्रिन्सवर अटकेची टांगती तलवार
नगरकरांना दिलासा…पाणीपुरवठा वाढणार
राहुरीत पतसंस्थेत 46 लाखांचा अपहार

जामखेड/प्रतिनिधी ः सरकारचे वागण्यात आणि बोलण्यात फरक आहे, त्यात विश्‍वासार्हता वाटत नाही, मग आणखी दोन महिन्यांचा वेळ द्यायचा कसा असा प्रश्‍न उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले व सहकार्‍यांनी उपस्थित करत उपोषणावर ठाम आहोत असे सांगितले. सरकारला जाग आणण्यासाठी धनगर समाजाने आंदोलन तीव्र करावे असे आवाहन प्रकाश शेंडगे यांनी केले. यावेळी सरकारने काढलेल्या हजारो कोटी रुपयांच्या शासन निर्णयाच्या जीआरची धनगर बांधवांनी चौडी येथे होळी करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पुणे ससुन रुग्णालयातं उपचारासाठी दाखल केलेले उपोषणकर्ते आण्णासाहेब रूपनवर यांनाही चौडी मध्ये आणले आहे. श्‍वासात श्‍वास असेपर्यंत उपोषण सोडणार असे उपोषणकर्ते आण्णासाहेब रूपनवर सूरेश बंडगर यांनी ठामपणे सांगितले.
चौडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मूबंई येथील बैठकीत समाधानकारक निर्णय झाला नाही.सरकार मराठा समाज व धनगर समाजासाठी वेगवेगळा न्याय करत आहे ही सरकारची भूमिका निषेधार्थ आहे. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना  कोणत्याही सरकारने आतापर्यंत न्याय दिला नाही. आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे तीनही पक्ष एकाच वेळी सत्तेत सहभागी आहेत.निवडणुक तोंडावर गोड अश्‍वासन देणारे हे तीनही पक्ष आता धनगर समाजासाठी काही भुमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.बैठकीत सरकारशी बोलणी निष्फळ झाल्यानंतर दि 22 रोजी राज्यभरातुन चौडी मध्ये धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. सरकार धनगर समाजाची चेष्टा करत आहे तेव्हा आंदोलनात आक्रमक भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त तरूण करत होते.यावेळी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, राष्ट्रीय संघटक गोविंद नरवटे, यशवंत सेनेचे महासचिव नितीन धायगुडे, माजी आ. प्रकाश शेडगे, आदित्य फतेपुरकर (पंढरपूर ), राजकुमार हिवरकर (माळशिरस), अभिजीत पाटील(पंढरपूर), अक्षय शिंदे, ,अभिजित शेडगे (आष्टी ),आशोक ढवण(आष्टी ),परमेश्‍वर खेडकर, हनूमंत भिसे, कांतीलाल पानसरे, अनिल पालवे, आबासाहेब पालवे, बापु हाके,(पुणे) अमित हाके, आदी उपस्थित होते.

अभ्यास ही वेळकाढूपणाची शक्कल – सोळा दिवसांनी जाग आली अन्  पुन्हा कोर्ट अन् कोर्ट सांगत आहात. आरक्षण कोर्टाची जवाबदारी आहे की सरकार म्हणून तुमची नाही का?. अभ्यास ही वेळकाढू पणाची शक्कल आहे. आता धनगर समाज बांधवांनी सरकारला आपला धनगरी हिसका दाखवण्याची गरज आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचे आवाहन उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले यांनी केले आहे.

COMMENTS