Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदा कोकणात जाणार्‍या रेल्वे गाडयांचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई/प्रतिनिधी ः गणपती उत्सव म्हणजे कोकणवासियांसाठी आनंदाची पर्वणी. या उत्सवासाठी प्रत्येक चाकरमनी आपल्या गावी कोकणात जाण्यासाठी धावपळ करत असतो.

काँग्रेसचे ते दोन मंत्री कोण ? जे सत्ते शिवाय राहू शकत !!नाही | LOK News24
जम्मू काश्मीरमध्ये 14 व्या दिवशीही चकमक सुरूच ; 3 जवान जखमी तर एका नागरिकाचा मृत्यू
आमदार थोरात व आमदार डॉ.तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात भव्य अश्वारूढ पुतळा साकारणार – सोमेश्वर दिवटे

मुंबई/प्रतिनिधी ः गणपती उत्सव म्हणजे कोकणवासियांसाठी आनंदाची पर्वणी. या उत्सवासाठी प्रत्येक चाकरमनी आपल्या गावी कोकणात जाण्यासाठी धावपळ करत असतो. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीपासूनच कोकणवासीय रेल्वेचे तिकीट आरक्षित करत असतात. मात्र रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोकणवासीयांना रेल्वेस्थानकांवर 5 ते 6 तास ताटकळत थांबावे लागत आहे. कोकणात जाणार्‍या रेल्वेगाड्या 6 तास उशिराने धावत असल्यामुळे कोकणवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 12 तासांच्या प्रवासासाठी कोकणाची वाट धरलेल्या चाकरमान्यांना तब्बल 18 तास लागत असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कोकण रेल्वेच्या डाऊन मार्गावर गाड्यांचा वेग मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच गाड्या तीन ते चार तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे नियमित गाड्यांनाही फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम काही रेल्वे गाड्यांवरही झाला आहे. रविवारी सकाळी सीएसएमटीहुन मडगावला जाणारी मांडवी एक्सप्रेस सुटलीच नाही. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने जाणार्‍या चाकरमान्यांच्या नशिबी प्लॅटफॉर्मवर तिष्ठत राहण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या गणेशोत्सवाची लगबग जोरदार सुरू आहे. प्रत्येकामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने कोकणवासी आपल्या गावी जात असतात. तसेच गावी जाण्यासाठी फलाटावर मोठी गर्दीही होत असल्याचे पाहायला मिळाले. रेल्वेने गावी जाण्यासाठी मुंबई, ठाण्यातील चाकरमानी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. या गर्दीमुळे काही प्रवाशांची ट्रेनही मिस झाली. त्यामुळे प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली होती. यंदा कोकणात 200 हून अधिक रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान आजही दिवा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची झुंबड उडाली होती. तसेच आपला जीव धोक्यात घालून प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असल्याचे चित्रही यावेळी पहायला मिळाले. कोकण रेल्वेच्या नियोजनाच्या अभावामुळे सर्व ट्रेन 5 ते 6 तास उशिरानं धावत आहेत. मागणी करूनही सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस मिरज मार्गे न वळवल्याने आणि मालगाड्या सुरू ठेवल्याने, चाकरमन्यांना तब्बल 18 तासांचा प्रवास करावा लागत आहे, लोक सावंतवाडीपर्यंत पोहोचणार केव्हा? म्हणजे चाकरमन्यांनी तीनशे रुपयांचे तिकीट काढून मुंबईतून यायचे आणि स्टेशनला उतरल्यावर एक हजार रुपयांची रिक्षा करून घरी जायचे का?, असा सवाल प्रवाशी संघटनांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS