श्रीगोंदा प्रतिनिधी :दहा दिवसांपूर्वी काष्टी येथून चोरीस गेलेल्या एका बुलेटसह पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करून तिघांन
श्रीगोंदा प्रतिनिधी :दहा दिवसांपूर्वी काष्टी येथून चोरीस गेलेल्या एका बुलेटसह पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करून तिघांना ताब्यात घेण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश मिळाले असून तिघांना पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काष्टी येथून दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी एक बुलेट चोरी गेल्याची तक्रार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सदर गुन्हयाचा तपास चालु असताना पोलिस निरीक्षक भोसले यांना गुप्तबातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सदर बुलेट अनिल ऊर्फ सोन्या मोतीराम आल्हाट रा. पारगाव व त्याचा साथीदार शुभम गोविंद वैरागड रा. घारगाव ता. श्रीगोंदा यांनी चोरली असून ते पारगाव शिवारात येणार असल्याची बातमी समजली. मिळालेल्या माहितीवरून पो नि भोसले यांच्यासह पोलीस पथकाने पारगाव परिसरात सापळा रचला अनिल ऊर्फ सोन्या आल्हाट व त्याचा साथीदार नामे शुभम गोविंद वैरागड यांना पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेवून अटक केली. पोलीस कस्टडीमध्ये केलेल्या चौकशीमध्ये वरील दोघांनी संगणमत करुन एकुण 5,70,000/- रुपये किंमतीच्या 6 मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली. त्यापैकी दोन लाख रुपये किंमतीच्या 3 मोटार सायकल आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या. उर्वरीत तीन लाख 70 हजार रुपये किंमतीच्या 3 मोटार सायकल त्यांनी गणेश विनायक शेलार, रा. नविण गार, ता. दौंड, जि. पुणे यास विक्री केल्याचे सांगितले. त्यामुळे गणेश शेलार यास गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेवून त्यास गुन्हयात अटक करुन त्याचेकडुन वरील प्रमाणे 3 मोटार सायकल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आल्या असून सदर गुन्हयात केलेल्या तपासामध्ये एकूण पाच लाख 70 हजार रुपये किंमतीच्या 6 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. वरील आरोपींवर श्रीगोंदा, मिरजगाव ता. कर्जत जि. अहमदनगर आणि लोणीकंद, जि. पुणे या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून नमुद आरोपी हे सध्या पोलिस कस्टडीमध्ये असून त्यांनी अशा प्रकारचे आणखी कोठे गुन्हे केले आहेत का ? याबाबत सखोल तपास चालु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भोसले यांनी यावेळी दिली .सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोसई समीर अभंग, पोना / गुलाब मोरे, पोना-गोकुळ इंगावले, पोकॉ प्रताप देवकाते, मनोज साखरे, तसेच मोबाईल सेलचे राहुल गुंडु, नितीन शिंदे व सेवानिवृत्त सफौ अंकुश ढवळे यांनी केली असून सदर गुन्हयाचा अधिक तपास पोना गोकुळ इंगावले हे करीत आहेत.
COMMENTS