Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलीच्या गालाला दिले इस्त्रीचे चटके

बॅड टचला विरोध नराधम बापाचे कृत्य

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यात एका नराधम बापाने आपल्या शाळेत जाणार्‍या मुलीला चुकीच्या पद्धतीने हात लावत तिचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. या मुलीने

ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; चौघांचा मृत्यू
पंतप्रधान मोदी युक्रेनला देणार भेेट
परराज्यातील कामगारांची नाव इथंल्या मतदार यादीत लावने म्हणजे आपल्या मातीशी बेईमानी होय- आ.धनंजय मुंडे

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यात एका नराधम बापाने आपल्या शाळेत जाणार्‍या मुलीला चुकीच्या पद्धतीने हात लावत तिचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. या मुलीने बापाला विरोध केल्यानंतर नराधम बापाने त्या मुलीला गरम इस्त्रीचे गालावर चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार कात्रज येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार भरती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 पीडित मुलगी ही 9 वीत असून ती कात्रज येथील एका शाळेत आहे. ती शनिवारी (दि 2) सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. यावेळी ती तिच्या घरात तिच्या गणवेशाला इस्त्री करत होती. यावेळी तिचा बाप पाठीमागून आला. यावेळी त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. ही बाब मुलीला खटकली. तिने या प्रकाराला विरोध करत बापाला याचा जाब विचारला. यावेळी चिडेलेल्या बापाने मुलीला जबर मारहाण करत शिवीगाळ देखील केली. एवढेच नाही तर तिच्या दफ्तरातील पुस्तके देखील त्याने फाडून टाकली. यानंतर त्याने पुन्हा मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या पद्धतीने मुलीला स्पर्श करत असतांना तिने त्याला मुलीने ढकलून दिले. याचा राग आल्याने बापाने मुलीच्या गालाला गरम इस्त्रीचा चटका देत पुन्हा तिला मारहाण केली. मुलीने आपली कशी बशी सुटका करून घेत पळ काढला. यानंतर तिने थेट भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली आहे. तिने सांगितलेल्या प्रकारामुळे पोलिस देखील हादरले असून नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक थले करत आहेत.

COMMENTS