Homeताज्या बातम्यादेश

मणिपुरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक

आठ जणांची गोळ्या घालून हत्या

इम्फाळ/वृत्तसंस्था ः तब्बल चार महिन्यांपासून मणिपूर उसळलेला हिंसाचार सुरूच असून, आतापर्यंत या हिंसाचारात तब्बल 160 जणांचा मृत्यू झाला आहे. 29 ऑगस

राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
सिरसाळ्यात महावितरणचा भोंगाळ कारभार! वसुली जोरात, लाईट कोमात; नागरिक आक्रमकदररोज 33 केव्हीचा बिघाड; हे गणित काय?वीज नसतानाही अव्वाच्या सव्वा बिल आणि वसुलीसाठी होणारा तगादा.विजेअभावी पिठाच्या गिरण्या, वेल्डिंग दुकाने आणि इतर लघुउद्योग संकटात.वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम.
प्रत्येक तालुक्यात दिव्यांगांसाठी शिबिरे घ्या: खा. नीलेश लंके यांची मंत्री डॉ. विरेंद्रकुमार यांच्याकडे मागणी

इम्फाळ/वृत्तसंस्था ः तब्बल चार महिन्यांपासून मणिपूर उसळलेला हिंसाचार सुरूच असून, आतापर्यंत या हिंसाचारात तब्बल 160 जणांचा मृत्यू झाला आहे. 29 ऑगस्टपासून कुकी आणि मैतेई समुदायात सुरू असलेल्या हिंसाचारात बिष्णुपूर आणि चुरचंदपूर जिल्ह्यात किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर एकूण 18 जण जखमी झाले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मणिपुरमध्ये सुरू असलेला हिंसाचार पुन्हा एकदा उफाळून आला आहे. बिष्णुपूर आणि चुराचंदपूर जिल्ह्यात कुकी आणि मैतैई गटाच्या लोकांनी एकमेकांवर तुफान गोळीबार केला आहे. यामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये एका गीतकाराचा समावेश असल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकार्‍यांनी दिली आहे. राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाल्याने मणिपुरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने तणावग्रस्त जिल्ह्यांमध्ये जमावबंदी तसेच संचारबंदी लागू केली आहे. तसेच हिंसाचाग्रस्त भागांमधील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मणिपुरच्या बिष्णुपूर आणि चुराचंदपूर जिल्ह्यांमध्ये गुरुवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत कुकी आणि मैतैई गटामध्ये भीषण संघर्ष सुरू होता. खोइरेंटक, खौसाबुंग आणि चिंगफेई या भागांमध्ये दोन्ही गटातकडून तुफान गोळीबार करण्यात आला आहे. त्यात आठ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका कलाकाराचाही समावेश आहे. संपूर्ण हिंसाचारात आतापर्यंत शांत राहिलेल्या खोइरेंटक या भागात गेल्या दोन दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना समोर येत असल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता केंद्र तसेच राज्य सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची मागणी केली जात आहे. हिंसाचारात आठ लोकांचा मृत्यू झाल्याने इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने मणिपूर बंदची हाक दिली आहे. यावेळी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारविरोधात आंदोलन केलं जाणार असून दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी कायदेशीर लढा दिला जाणार असल्याचं आयटीएलएफकडून सांगण्यात आलं आहे. गुरुवारी झालेल्या गोळीबारात प्रसिद्ध गीतकार एएस मंगबोई यांची देखील हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

COMMENTS