Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर केवळ शहरापुरतेच

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा घेतला होता. याला केंद्र सरकारने मंजुरी दिल

राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
लीलाबाई दरदले यांचे निधन
कर्नाटक भाजपमधील बंडाळी

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा घेतला होता. याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर, अनेकांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांची नावे महसूल क्षेत्रात (जिल्हा आणि तालुका पातळीवर) औरंगाबाद आणि उस्मानाबाद अशीच नाव राहणार असल्याचा निकाल हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यांची नव्हे तर केवळ शहरांचंच नामांतर झाल्याचे हायकोर्टाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर झाल्यानंतर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहचले. त्यावेळी जिल्ह्यांचे नाही तर केवळ शहराचेच नामांतर करण्यात आल्याचा दावा शिंदे-फडणवीस सरकारने कोर्टात केला. परंतु त्यावर सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय न घेण्यात आल्यामुळे हायकोर्टाने आपला निकाल सुनावला आहे. हायकोर्टाने नामांतराला आव्हान देणार्‍या सर्व याचिका आज निकाली काढल्या आहे. त्यामुळे आता नामांतर केवळ शहरांपुरतेच होणार असल्याचे सिद्ध झाले आहे. परंतु आता राज्य सरकारने याचिकांच्या वैधतेवर आक्षेप घेतला असून निर्णय बदलण्याचे संकेत दिले आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या नामांतराचे आदेश निघतील, त्यावेळी याचिकाकर्त्यांना नव्याने याचिका दाखल करण्याची मूभा हायकोर्टाने दिली आहे. याशिवाय सुनावणी सुरू असताना सध्या तालुका आणि जिल्हा पातळीवर जुनंच नाव वापरण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून कोर्टात सांगण्यात आले आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी येत्या चार ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

COMMENTS