कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औषधाची जबाबदारी अन्न-औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांकडे : जिल्हाधिकारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औषधाची जबाबदारी अन्न-औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांकडे : जिल्हाधिकारी

सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून कोविड बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दापाश
Paranda : डोमगावात आराध्य दैवत रामायण कार महर्षि वाल्मिकी जयंती साजरी (Video)
गोविंद तांडा येथील  शेतकर्‍यांची आत्महत्या

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून कोविड बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पुरविणे आवश्यक आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात औषध साठा असणे आवश्यक आहे. तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे व त्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. आपत्तीजनक परिस्थिती सातारा जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करणे गरजेचे झाले आहे. याप्रकारची कामे करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मनिषा जवंजाळ यांची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशाद्वारे नियुक्ती केली आहे.

श्रीमती जवंजाळ यांनी पार पाडावयाची जबाबदारी पुढीलप्रमाणे : कोविड-19 संक्रमित रुग्णांची रुग्णालयातील दैनंदिन दाखल संख्येबाबत सर्व हॉस्पीटल प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवावा. जिल्ह्यातील मेडिकल ऑक्सीजन, रेमिडिसवर इंजेक्शन व अन्य अनुषंगिक औषधांचा तुटवडा भासणार नाही यासाठी तात्काळ नियोजन आखणे. कोविड 19 चे औषधोपचार न मिळाल्याने मृत्यू होवु नये. यासाठी औषध वितरण व्यवस्था सुरळीत पार पाडली जाईल, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. सातारा जिल्ह्यात औषधांचा काळाबाजार, अवैध साठेबाजी होणार नाही यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात. कामकाज हे आपल्या स्तरावरुन आवश्यक अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती करुन त्यांच्या सहाय्याने करावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमूद केले आहे.

COMMENTS