राहुरी/प्रतिनिधीः आगामी 1 सप्टेंबरला राहुरी शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू,बहूजनसम्राट,राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा ह
राहुरी/प्रतिनिधीः आगामी 1 सप्टेंबरला राहुरी शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू,बहूजनसम्राट,राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे.या जाहीर सभेकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. समाजाच्या भविष्यासाठी,संविधान रक्षणासाठी,दलित-अल्पसंख्याक-आदिवासी-ख्रिश्चन-महिलांच्या न्याय हक्कासाठी या जाहीर सभेला समर्थन देण्याची भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने घेतलेली आहे. अशी माहीती अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुरेन्द्र थोरात यांनी दिली.
दिवसेंदिवस समाजातील दलित-अल्पसंख्याक-आदिवासी-ख्रिश्चन-महिला या घटकांवर होणार्या अत्याचारात वाढ होत आहे. धर्माच्या नावाखाली बहुजन समाजातील तरुणांची माथी भडकविण्याचे काम सुरळीत चालू आहे. देशासमोर बेकारी,दरवाढ,महागाई,शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार असे अनेक प्रश्न समोर असून सुध्दा शासनकर्ते त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.त्याउलट जाती-जातीत भांडणे लावण्याचे उद्योग काही जातीयवादी संघटना करीत आहेत. या सर्व प्रकारच्या परिस्थितीला उत्तर म्हणजे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा होय. त्या अनुषंगाने राहुरी तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका जाहीर केली.राहुरी तालुका हा जिल्ह्यातील सर्वधर्मसमभाव जपणारा,शांत,विकसनशील तालुका म्हणून प्रसिद्ध आहे, पण गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्याच्या या प्रसिद्धीला बदनाम करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे दिसून येते.उंबरे या गावातील प्रकरण, राहुरीतील जेष्ठ पत्रकार यांच्या घरावर झालेला भ्याड हल्ला, या दोन्हीही घटनांत विशिष्ट धर्मियांना टारगेट करून अल्पसंख्याक समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो.जाणीवपूर्वक काही सत्ता भारताचे संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणवते.
राहुरीत झालेल्या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक जिल्हा संघटक अनुसंगम शिंदे यांनी केले.अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेबाबत तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे,मा.नगरसेवक अरुण साळवे,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रविण लोखंडे, जिल्हा सरचिटणीस सिद्धांत सगळगीळे,जेष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद,राजेंद्र साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार परिषदेसाठी आलेल्या पत्रकारांचे आभार रिपाइंचे राहुरी तालुका उपाध्यक्ष सुनिल चांदणे यांनी मानले.
COMMENTS