Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिंचोली माळी येथे अवैध दारू विक्री जोमात !

दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे सर्रास अवैध दारू जोरदारपणे सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्कव स्थानिक पोलिसांच्या आशीवार्दामुळे चिं

नाशिकमध्ये मोबाईलचा स्फोट होऊन 3 जण जखमी
तो’ वेळीच धावला, लोक म्हणतायत ‘तो’ देवदूत बनून आला 
दहावी-बारावीचा निकाल वेळेत लागणार

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे सर्रास अवैध दारू जोरदारपणे सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्कव स्थानिक पोलिसांच्या आशीवार्दामुळे चिंचोली माळी येथे अवैध दारू विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत. दरम्यान पोलिस प्रशासनाने चिंचोली माळी येथील दारू विक्री करर्णायांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. चिंचोली माळी भाजीमंडईत सर्वसामान्याना जाणे आता अडचणीचे होत आहे. या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत खुलेआम अवैध देशी दारुची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेष म्हणजे चिंचोली माळी गाव हे पोलिस ठाण्यापासून अवघ्या 9 किलोमटर अंतरावर आहे तरी हे धंदे राजरोस सुरू असून, केज पोलिस प्रशासन पथकाचे याकडे सर्रास दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे. चिंचोली माळी नागबेट व गावातील चौकात मोकळी जागा आहे. ही जागा अवैध धंदे करणार्‍यासाठी नंदनवन ठरत आहे. विशेष म्हणजे चिंचोली माळी सध्या नागबेट वस्ती या ठिकाणी अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैधरित्या थाटलेल्या या दुकानाच्या आसपास तळीरामांची गर्दी दिसून येते. या तळीरामाच्या त्रासाला अनेक महिलांना सामोरे जावे लागते. तात्पुरता आडोसा तयार करून या ठिकाणी हे अड्डे सुरू करण्यात आले आहेत. वाईनशॉपपेक्षा पाच ते दहा रुपये जास्त दर आकारून ही देशी दारू विकण्यात येते. ग्राहकांसाठी येथे अडचालका पाणी पाऊच, ग्लास तसेच चखण्याची देखील व्यवस्था असल्याने हे अड्डे चांगलेच चालत आहेत. येथील व्यापारी वर्ग, तसेच खरेदीसाठी येणारे ग्राहक यासर्व बाबींनी त्रस्त झाले आहेत, मात्र केज पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई या विक्रेत्यावर होत नाही तरी केज पोलीस ठाण्या कडुन अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी व गाव दारु मुक्त करण्यात यावे अशी मागणी समस्त गावकर्‍यांच्या वतीने करण्यात येत आहे .

COMMENTS