Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगावमध्ये आढळला ‘लेप्टोस्पायरोसिस’चा रुग्ण

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात पहिल्यांदाच ‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचा रुग्ण आढळून आला असून, डांगरी येथील चार वर्षांच्या बालकाला ही लागण झाल

बिबट्यांची नसबंदी, वन्यजीव हल्ल्याच्या नुकसान भरपाईत कोंबड्यांचा समावेश करावा :आमदार सत्यजीत तांबे
जागृती शुगर कडून 200 रुपयाचा हप्ता उस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर जमा
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मासूम’

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात पहिल्यांदाच ‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचा रुग्ण आढळून आला असून, डांगरी येथील चार वर्षांच्या बालकाला ही लागण झाली आहे. जिल्हास्तरावरील आरोग्य विभागाच्या पथकाने डांगरी येथे भेट देत पाहणी केली.  अमळनेर तालुक्यात प्रथमच या रोगाचे रुग्ण आढळून आले असून, चार वर्षांच्या बालकाला लागण झाली होती. हे कुटुंबीय ऊसतोडीसाठी बाहेर जिल्ह्यात गेले होते. परत आल्यावर कुटुंबातील बालक आजारी पडल्याने धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी हे निदान करण्यात आले.

COMMENTS