Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा

मुंबई पोलिसांच्या सूत्रांची माहिती; व्हिडिओ लिक करणार्‍याचा शोध सुरू

मुंबई/प्रतिनिधी ः भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा अश्‍लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती, मात

पुण्यात सीएनजी महागला
गोदामाई प्रतिष्ठानचे कार्य युवकांसाठी कौतुकास्पद ः माजी मंत्री ढाकणे
लातूरमध्ये अवकाळीचा कहर, वीज पडून एकाचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा अश्‍लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती, मात्र मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ मॉर्फ नसून खरा असल्याचा दावा केला. तपास पथकाने सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचे विश्‍लेषण केले. त्यात तो व्हिडिओ खरा असल्याचे निष्पन्न झाले. आता पोलिस हा व्हिडिओ लिक करणार्‍याचा शोध घेत आहेत, असे सूत्रांनी म्हटले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ एका मराठी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केला होता. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या ऐन तोंडावर हा व्हिडिओ लिक झाला होता. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजपला चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 10 कडे सोपवण्यात आला. गुन्हे शाखेने प्राथमिक आधारावर संबंधित वृत्तवाहिनीशी संपर्क साधून व्हिडिओची मागणी केली. त्यानंतर त्याचे विश्‍लेषण केले असता हा व्हिडिओ खरा असल्याचे निष्पन्न झाले, असे सूत्रांनी सांगितले. एका मराठी वृत्तवाहिनीने 17 जुलै रोजी किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडत सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोमय्या यांनी धमकावून काही मराठी महिलांचे शोषण केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यांनी सोमय्या यांच्या व्हिडिओचा समावेश असणारा पेनड्राइव्ह उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली. राज्य महिला आयोगाने यासंबंधी मुंबई पोलिसांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या प्रकरणी म्हणाल्या होत्या की, किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अनेक सामाजिक संस्थांनी महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यानुसार, महिला आयोगाने मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रकरणाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.

COMMENTS