Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा यांचे बेमुदत उपोषण सुरु

म्हसवड / प्रतिनिधी : उरमोडीचे पाणी राऊतवाडी बंधार्‍यामध्ये सोडावे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा यांनी बेमुदत उप

जात पडताळणी समितीची आजपासून विशेष त्रुटी पुर्तता मोहिम
मांढरदेव यात्रेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा : प्रमुख जिल्हा न्यायाधीश न्या. व्ही. आर. जोशी
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमिवर प्रशासकीय इमारतीच्या परिसराची अधिकारी कर्मचार्‍यांकडून स्वच्छता

म्हसवड / प्रतिनिधी : उरमोडीचे पाणी राऊतवाडी बंधार्‍यामध्ये सोडावे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचे निवेदन देऊनही उरमोडीचे पाणी न सोडल्याने सिन्हा यांनी सोमवारपासून आमरण उपोषणाला उपोषणाला सुरुवात केली आहे. म्हसवडसह पूर्व भागातील राऊतवाडी, माने वस्ती, ढोकमोड, हिंगणी, देवापूर भागात जनावरांना व माणसांना दुष्काळी परिस्थितीचा फटका मोठा बसत असून प्रचंड हाल सुरु आहेत. तरीही या परिस्थितीत त्यांना उरमोडीचे पाणी मिळाले तर काहीअंशी दिलासा मिळेल. या भागातील शेतकर्‍यांनी उरमोडीच्या पाण्यासाठी पैसेही भरले तरी अद्याप पाणी सोडण्यात आले नाही.
माजी नगराध्यक्ष विजयभाऊ सिन्हा यांचे पाण्यासाठी बेमुदत उपोषण करत आहेत. बेमुदत उपोषणाला माजी दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आ. महादेव जानकर, माजी नगराध्यक्ष नितिन दोशी, सुनिल पोरे, किशोर सोनवणे, कैलास भोरे, जवाहर देशमाने, बाळासाहेब राजेमाने, संजय भागवत, शशी देठे, सपोनि राजकुमार भुजबळ तसेच चळवळीतील ज्येष्ठ सहकारी तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपोषणाला भेट दिली. तसेच शहरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

COMMENTS