छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एका उद्योगपतीं
छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एका उद्योगपतींच्या घरी भेट झाल्यानंतर केंद्राकडून शरद पवारांना ऑफर देण्यात आल्याची चर्चा सुरू होती, मात्र शरद पवारांनी हा दावा फेटाळून लावत आपण भाजपसोबत कदापी जाणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करत महाविकास आघाडी पुढील निवडणूका एकत्र लढतील असा दावा केला. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, अजित पवारांसोबतची आपली भेट गुप्त नव्हती, तर मी त्यांना उघडपणे भेटलो, असे स्पष्ट केले. तसेच ते मला काय ऑफर देणार, मीच त्यांच्या पक्षाचा संस्थापक आहे, अशी कोपरखळीही त्यांना मारली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपच्या ऑफरविषयी केलेले आरोप स्पष्ट शब्दांत धुडकावून लावले. शरद पवार म्हणाले की, माझी आणि अजित पवार यांची भेट ही गुप्त नव्हतीच. मी उघडपणे त्या ठिकाणी गेलो होतो. त्या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. माजी मुख्यमंत्री माझ्याबद्दल काय बोलतात त्याच्याशी माझा कोणतीही संबंंध नाही. मला ऑफर देणारे, माझ्याशी कोण चर्चा करणार आहे? जे लोक ज्या पक्षात होते. त्यांच्या संस्थापक कोण, त्यामुळे ही चर्चा वायफळ आहे, असे मला वाटते. अजित पवार आणि माझी कौटुंबिक भेट होती. मी तर उघडपणे गाडीतून त्या ठिकाणाहून गेली. त्यामुळे गुप्तभेटीत कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांच्या घरात दोन मुलांचे लग्न बाकी आहेत. त्यासंदर्भात कुटुंबातील मोठा व्यक्ती म्हणून मला विचारणा झाली. मी त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार की नाही. त्यामुळे ही चर्चा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने होऊ लागली आहे. यावर पडदा टाकला गेला पाहिजे, असे मला वाटते. जे लोक आमच्यातून सोडून भाजपसोबत गेले. त्यांच्याशी आमचा काही एक संबंध नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही भाजपविरोधात काम करणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मविआ म्हणून आम्ही निवडणूका लढवणार आहोत. माध्यमांमधील चर्चांना मी महत्त्व देत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांनी मोदींविरोधात लढण्याची भूमिका स्पष्ट करून संभ्रम दूर करण्याची मागणी केली. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, मी माझ्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच मोदींचे गुणगान गायले आहे का? माझे म्हणणे सर्वांनी ऐकले आहे. आमची लढाई ही कायम मोदीविरोधातच असणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आगामी निवडणूक भाजपसाठी अनुकूल नाही – देशात भाजपविरोधी वातावरण तयार होत आहे, त्यामुळे आगामी निवडणुका भाजपसाठी अनुकूल नाहीत. 2024 मधील लोकसभा निवडणूक भाजपसाठी अनुकूल नाही. अनेक राज्यांमध्ये सरकार पाडून भाजप सत्तेत आले, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीय केंद्रीय यंत्रणाच्या कारवाईवरुन भाजपाला टोला लगावला आहे. यावेळी ते म्हणाले की राष्ट्रीय नेत्यांपेक्षा ईडी निर्णय घेते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावाच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले. ठाकरे गटाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता, त्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला होता, असा आरोपही त्यांनी केला.
COMMENTS