Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पश्‍चिम महाराष्ट्रात वीजग्राहकांकडे सुरक्षा ठेवीच्या रकमेची थकबाकी 2352 कोटींवर

पुणे / प्रतिनिधी : पश्‍चिम महाराष्ट्रातील लघु व उच्चदाब वीज ग्राहकांना गेल्या एप्रिल व मे महिन्याच्या वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्

भाजप पक्षात घराणेशाहीला स्थान नाही : निशिकांत भोसले-पाटील
कायद्याच्या अंतिम वर्षाच्या अखेरच्या सत्रातील एक पेपर रद्द; शिवाजी विद्यापीठाचा निर्णय ; विद्यार्थ्यांना दुसर्‍यांदा द्यावी लागणार परिक्षा
जयंत पाटील राजकारणातील नारदमुनी : सुरज चव्हाण

पुणे / प्रतिनिधी : पश्‍चिम महाराष्ट्रातील लघु व उच्चदाब वीज ग्राहकांना गेल्या एप्रिल व मे महिन्याच्या वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत 48 लाख 51 हजार 536 ग्राहकांकडे सुरक्षा ठेवीचे 2352 कोटी 59 लाख रुपयांची थकबाकी आहे. या सर्व ग्राहकांना सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यासाठी महावितरणकडून 30 दिवसांच्या मुदतीची नोटीस देण्यात येत आहे. या मुदतीनंतरही रक्कम भरली नाही तर नाईलाजाने संबंधितांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
दरम्यान, वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या ऑनलाईन भरण्याची सोय ुुु.ारहरवळीलेा.ळप वेबसाईट व महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता 2021 च्या विनिमय 13.1 नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते. त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीज वापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्‍चित करण्यात येते. वीज ग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक (कृषी ग्राहक) असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय 13.11 नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.
त्याप्रमाणे वीज ग्राहकांनी याआधी भरलेली सुरक्षा ठेव व नियमानुसार आवश्यक असलेली ठेव यातील फरकाच्या रकमेचे स्वतंत्र बिल गेल्या एप्रिल व मे महिन्यात देण्यात आली आहेत. तथापि अद्यापही लघुदाबाच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर 48 लाख 47 हजार 120 ग्राहकांकडे 1853 कोटी 7 लाख रुपयांची आणि उच्चदाबाच्या 4 हजार 416 वीज ग्राहकांकडे 499 कोटी 52 लाख रुपयांची थकबाकी आहे. या दोन्ही वर्गवारीमध्ये पुणे जिल्ह्यात 25 लाख 81 हजार 14 ग्राहकांकडे 1487 कोटी 92 लाख, सातारा जिल्ह्यात 4 लाख 84 हजार 757 ग्राहकांकडे 134 कोटी 64 लाख, सोलापूर जिल्ह्यात 5 लाख 57 हजार 475 ग्राहकांकडे 181 कोटी 16 लाख, कोल्हापूर जिल्ह्यात 7 लाख 33 हजार 803 ग्राहकांकडे 407 कोटी 15 लाख आणि सांगली जिल्ह्यामध्ये 4 लाख 94 हजार 487 ग्राहकांकडे 141 कोटी 72 लाख रुपयांची थकबाकी आहे.

COMMENTS