Homeताज्या बातम्यादेश

भाजपसोबत जाण्याचा प्रश्‍नच नाही

शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केले आश्‍वस्त

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे कार्यकर

शरद पवारांमुळे महाविकास आघाडीत रोडा !
जनता अशा शक्तींना उलथवून टाकेन ः शरद पवार
शरद पवारांच्या भेटीनंतर निवडणूक चाणक्य राहुल गांधीच्या भेटीला l पहा LokNews24

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष होते. मात्र शरद पवारांनी अजित पवार गटावर कोणतीही कडवट टीका केली नसून, अजित पवार गटाने शरद पवारांची भेट त्यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी आशीर्वाद देण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर शरद पवार पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठ शेअर केल्यामुळे शरद पवार भाजपसोबत जातील अशी शक्यता होती, मात्र पवारांनी मंगळवारी सर्व संभ्रम दूर करत, भाजपसोबत जाण्याचा प्रश्‍न नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांना आश्‍वस्त केले आहे. शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांसमोर मांडली. त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँगे्रसच्या फुटीनंतर पहिलीच सभा छगन भुजबळांचा मतदारसंघ येवल्यात घेत शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर अजित पवार गटाने शरद पवार यांची भेट घेतली व शरद पवारही मवाळ झालेले दिसले. अशातच कालच राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर मतदान झाले. मात्र, त्यासाठी कोणताही व्हीप राष्ट्रवादी पक्षाकडून बजावण्यात आला नाही. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला. शरद पवारांच्या भूमिकेबाबत केवळ सामान्यच नव्हे तर पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे दिसते. या पार्श्‍वभूमीवर शरद पवारांनी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानि पदाधिकार्‍यांची बैठक बोलावत आपली भूमिका स्पष्ट करत पदाधिकार्‍यांच्या मनातील शंका-कुशंका दूर करण्याचा प्रयत्न केला. आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा, असा सल्ला देत शरद पवार म्हणाले, मागच्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर होते. त्यावरुनही शरद पवार यांना लक्ष्य केले जात असून त्यांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहेत.

पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यासाठी केंद्राकडून दबाव- पदाधिकार्‍यांच्या बैठकीत संबोधित करतांना शरद पवार म्हणाले की, पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याबाबत केंद्राकडून दबाव टाकला जात असल्याची माहिती आहे. पण काहीही झाले तरी आपण पुन्हा सगळे उभे करू. काहीही झाले तरी आपण तडजोड करणार नाही, आपल्याला भाजप विरोधातच लढायचे आहे. मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका. आपण भाजपबरोबर जाणार नाही. मनात कुठेही शंका आणू नका. आगामी निवडणूकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा, आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जा, असे आवाहन यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केले.

COMMENTS