Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ

पुत्र प्राप्तीच्या विधानाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रसिद्ध कीतर्नकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होतांना दिसून य

प्राध्यापक व कर्मचार्‍यांच्या दमबाजीमुळे विद्यार्थी पडला बेशुद्ध
राजकारणातील अपरिहार्यता
आमदार जगतापांचा कोटयवधीचा भ्रष्टाचार ; मुख्यमंत्र्यांकडं तक्रार |

मुंबई/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रसिद्ध कीतर्नकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. पुत्र प्राप्तीबाबतचे विधान त्यांना भोवण्याची शक्यता असून,  मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
इंदोरीकर महाराजाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. त्याविरोधात इंदोरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र खंडपीठाचे निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने इंदोरीकर यांना दणका दिला आहे. त्यामुळे आता इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंदोरीकर महाराज यांनी स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असे सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला असे म्हटल्यासंदर्भातील हे प्रकरण आहे.

सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होण्याचे विधान भोवणार- इंदोरीकर महाराज यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी शिर्डीतील ओझर येथे कीर्तनादरम्यान केलेल्या निरुपणात ’सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, इंदोरीकर महाराज यांचे कीर्तनातील हे विधान म्हणजे समाजप्रबोधन अथवा सामान्य विधान नव्हे. तर ती चक्क गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती.

COMMENTS