Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार

शरद पवारांचा प्रीतीसंगमावरून इशारा

सातारा प्रतिनिधि - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासोबत तब्बल

शरद पवारांचा राजीनामा म्हणजे घरगुती तमाशा
आपल्या मर्जीनुसार शरद पवार पक्ष चालवतात
शरद पवार पुन्हा नाशिकच्या होम पिचवर

सातारा प्रतिनिधि – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासोबत तब्बल 40 आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र अजित पवार यांच्या बंडाबाबत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर शक्तिप्रदर्शन करत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ‘भाजपच्या प्रवृत्तीला काही लोक बळी पडले; असं म्हणत राज्यातील राजकीय भूकंपावर भाष्य करत शरद पवारांनी भाजपवर टीका केली. शरद पवार यांनी साताऱ्याच्या कराडमध्ये प्रितिसंगमावर मोठं शक्ति प्रदर्शन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, ‘ यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी ठिकाणी आपण एकत्रित आलो आहोत. यशवंतराव चव्हाण यांनी सामान्य माणसाचा सहभाग लोकशाही असला पाहिजे. युवाशक्ती जोरावर महाराष्ट्र पूढे नेण्याच काम केलं. आज यशवंतराव नाहीत, पण त्याचे विचार पुढे घेऊन जायच ठरवून पुढे जात आहोत’. ‘आज देशात आणि राज्यात माणसांमाणसात संघर्ष कसा होईल असा वर्ग आहे. गेले काही काळात राज्यातील काही ठिकाणी संगमनेर,कोल्हापूर या ठिकाणी जातीय दंगली झाल्या, हे महाराष्ट्राला शोभणार नाही. आपल्याला एका शक्ति विरुद्ध उभा राहिला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. ‘चुकीच्या प्रवृत्ती डोक वर काढत आहेत. महाराष्ट्र राज्यात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या पक्षाला धक्का देण्याच काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जी उलथापालथ होते, त्यातच आपल्यातील काही सहकार्य बळी पडले आहेत. उलथापालथ करणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या शक्ती आणि प्रवृत्तीला धक्का देऊ, महाराष्ट्र फिरू, असा इशारा शरद पवारांनी भाजपला दिला आहे.

COMMENTS