Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विंचूरच्या 17 युवकांनी एकाच वेळी विश्व हिंदु परिषद-बजरंग दलात घेतला सहभाग. 

जनेश्वरानंद गिरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी नियुक्ती सोहळा पार पडला.

विंचूर प्रतिनिधी - विंचूर येथील भारत माता आश्रमाचे संस्थापक श्री स्वामी 108 परमपूज्य जनेश्वरानंद गिरी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा साधू संत,

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना
लक्ष्मण रेषा ओलांडल्याचे परिणाम कोरोनाने दाखविले ; मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा
मंगळवेढा तालुक्यात विषबाधा; दोन लहान मुलींचा मृत्यू

विंचूर प्रतिनिधी – विंचूर येथील भारत माता आश्रमाचे संस्थापक श्री स्वामी 108 परमपूज्य जनेश्वरानंद गिरी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा साधू संत, भक्त परिवार तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे  पदाधिकारी यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने  ओम साई माँ ग्रुप,नाशिक सादर सुंदर कांड भजन चे आयोजन करण्यात आले होते. सर्व भक्त परिवाराकडून महाराजांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर मंदिरात आरती करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वाढते लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या अशा वारंवार घडणाऱ्या घटना बघता धर्मकार्य करण्यासाठी  विंचूर परिसरातील 17 युवकांनी महाराजांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मध्ये सहभाग घेतला. नियुक्ती झालेली पदाधिकारी पुढील प्रमाणे विंचूर विश्व हिंदू परिषद अध्यक्षपदी सौरभ गाडे, उपाध्यक्षपदी वैभव सूर्यवंशी,कार्याध्यक्ष महेश दरेकर यात्रा प्रमुख यश चौधरी,बजरंग दल सहसंयोजक पदी राहुल नागरे,बजरंग दल संघटक अंकुश सूर्यवंशी , प्रचार व प्रसार संपर्कप्रमुख प्रथमेश सूर्यवंशी,सत्संग प्रमुख कृष्णा मलिक, मठ मंदिर प्रमुख सोनू राजभर, बजरंग दल संघटक पदी शुभम भोसले, अक्षय पारोळेकर प्रसाद राऊत, अश्विन गायकवाड यांची नियुक्ती. गोरक्ष प्रमुख ऋषिकेश शिरसाठ, गोरक्षक प्रणव ढवन व राहुल जाधव तर बजरंगी राहुल गरड यांची नियुक्ती करण्यात आली महाराजांच्या वाढदिवसानिमित्त ही नियुक्ती करण्यात आल्याने संपूर्ण पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

COMMENTS