शेतकर्‍यांच्या परवानगीनेच कृषी कायदे लागू होणार ; मंत्री सत्तार यांची ग्वाही

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांच्या परवानगीनेच कृषी कायदे लागू होणार ; मंत्री सत्तार यांची ग्वाही

अहमदनगर-प्रतिनिधी-केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी काय केले. सात महिने झाले शेतकर्‍यांचे आंदोलन दिल्लीत सुरू आहे. मात्र, आमच्या राज्य सरकारने शेतकर्‍यां

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस घेणे आवश्यक ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार
पुन्हा कोर्टात जाऊ व नाराजी दूर करू : मंत्री सत्तार
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार


अहमदनगर-प्रतिनिधी-केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी काय केले. सात महिने झाले शेतकर्‍यांचे आंदोलन दिल्लीत सुरू आहे. मात्र, आमच्या राज्य सरकारने शेतकर्‍यांचे कायदे करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगोदर हे कायदे शेतकर्‍यांना सांगा, त्यांनी जर परवानगी दिली तरच लागू करा, असे सांगितले आहे. हा या दोन सरकारमधील फरक आहे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी येथे केले. दरम्यान, नगर तालुक्यातील पारगाव भातोडी हे गाव आपण दत्तक घेतले असल्याचे त्यांनी जाहीर केले.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामसंसद भवन योजनेअंतर्गत नगर तालुक्यातील पारगाव भातोडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन व जिल्हा परिषद शाळेचे भूमिपूजन मंत्री सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा परिषदेचे कृषी विभागाचे सभापती काशिनाथ दाते, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, युवा व्याख्याते गणेश शिंदे, सभापती सुरेखा गुंड, दिलीप पवार, सरपंच मीनाक्षी शिंदे, उपसरपंच ताराबाई भोसले, अर्जुन गाडे, राजेंद्र ठोंबरे उपस्थित होते.
शेतकर्‍यांशी बोलायला केंद्र सरकार तयार नाही. शेतकरी मायबाप असताना त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही, ही एक प्रकारची हुकूमशाही म्हणावी लागेल. पण दुसरीकडे राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी कायदा करण्याचा विचार केला, तेव्हा तो कायदा तयार करताना अगोदर शेतकरी माय-बापाला विचारा, असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. कायद्याचे वाचन गावा-गावात करा. जर त्याला शेतकर्‍यांनी मान्यता दिली, तर तसे कायदे लागू करा, असे त्यांनी सांगितले असल्याचे सांगून सत्तार म्हणाले, शेतकर्‍यांची कर्जमाफी राज्य सरकारने केली. जे नियमित कर्जफेड करणार आहेत, त्यांना पन्नास हजार रुपये निश्‍चितपणे देणार, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले आहे व ते जे काही शब्द देतात, ते पाळतात, असेही सत्तार म्हणाले.

ड्रोन सर्व्हे करणार
आता गावांमध्ये ज्या मिळकती आहेत, त्या निश्‍चित करण्यासाठी महसूल व ग्राम विकास यंत्रणेने ड्रोनच्या माध्यमातून सर्वे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या प्रॉपर्टी नवीन झाल्या आहेत, त्यांना नंबर देण्यासाठी व त्यांची मालकी सिद्ध करण्यासाठी, याचा निश्‍चितपणे उपयोग होईल, असे सांगून ते म्हणाले, जे जुने सात-बारे उतारे आहेत, त्यामध्ये अनेक तफावती आहेत. त्या दुरुस्त करण्याचा निर्णय सुद्धा सरकारने घेतला आहे. तर नवीन पद्धतीद्वारे पिकांची नोंद सुद्धा आता घेण्यास सुरुवात झाली असल्याचे ते म्हणाले. एकत्रितपणे गावाच्या विकासासाठी प्रयत्न करा व आदर्श गाव करा. या गावासाठी तुम्हाला कधीही निधी कमी पडू देणार नाही. गावाच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी तात्काळ दोन कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या जेवढ्या योजना असतील, त्या गावात राबवल्या जातील. दर तीन महिन्यांनी या गावच्या विकासाचा आढावा घेणार असून, आजपासून पारगाव भातोडी हे गाव मी दत्तक घेतले आहे, असे मंत्री सत्तार यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांनी, विकास निधी वापरण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर अटी-शर्ती घालून दिलेल्या आहेत. केंद्राने आडकाठी केलेल्या आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य पातळीवर धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. दाते यांचेही यावेळी भाषण झाले. गणेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सागर शिंदे यांनी केले.

तातडीने आदेश
शिंदे यांनी प्रास्ताविकात भातोडी पारगाव तलावाला सरकारी जमिनीवर नाव लावून देण्याची मागणी केली.त्यावर बोलताना मंत्री सत्तार यांनी लगेच पारगाव भातोडी या ठिकाणी असलेल्या 700 एकर तलावाच्या जमिनीचा विषय तहसीलदार यांनी तीन महिन्यात मार्गी लावून त्या जागेला नाव लावून द्यावे, असे आदेश दिले. ग्रामस्थांनी यावेळी टाळ्यांचा कडकडाट केला.

COMMENTS