Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची माहिती

नाशिक प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट, 2023 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा य

पुण्यात सलग तिसर्‍या दिवशी एका तरूणाची हत्या
पाचगणी बसस्थानकात पुन्हा लाल परी प्रवाशांच्या सेवेत रुजू
सत्ताधारी जातवर्गाला सत्तेचे अपचन!

नाशिक प्रतिनिधी – नाशिक जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट, 2023 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. महसूल विभागामार्फत जिल्हास्तरीय महसूली कामे वेळेच्यावेळी पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसूलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणांची चौकशी करणे इत्यादी कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करुन महसुल वसुलीचे उद्दिष्ट पार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, महसुल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी नाशिक जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट, 2023 या कालावधीत प्रत्येक दिवशी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

असा असेल ‘महसूल सप्ताह कार्यक्रम’ – मंगळवार, 1 ऑगस्ट, 2023 रोजी दिनांक 26 जानेवारी ते 30 एप्रिल, 2023 या कालावधीत राबविण्यात आलेल्या “महाराजस्व अभियान” अंतर्गत केलेल्या कामाची दखल घेऊन विभागनिहाय उत्कृष्ट काम करणा-या अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार, अवल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांचा उत्कृष्ट अधिकारी , कर्मचारी म्हणून गौरव करुन सन्मान करण्यात येणार आहे. बुधवार, 2 ऑगस्ट, 2023 रोजी “युवा संवाद” आयोजित करण्यात येणार असून यात दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकरीता राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र इ. शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले, प्रमाणपत्र मिळणेबाबत अर्जदारांनी दाखल केलेले व प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढून संबंधित अर्जदारांना सदर दाखले, प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

गुरुवार, 3 ऑगस्ट, 2023 रोजी ‘एक हात मदतीचा’ या  कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मान्सुन कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे, शेतीचे, फळबागांचे, जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिनियमामधील तरतुदीनुसार बाधीत नागरिकांना देय असलेल्या सोईसुविधा, नुकसान भरपाई देण्याबाबत आढावा घेण्यात येईल. तसेच खरीप हंगामामध्ये घेण्यात येणा-या पिकांचे विमा उतरविण्याकरीता अर्जदारांच्या मागणीनुसार, पिक पेरा अहवाल, सात बारा व 8-अ असे तलाठीस्तरावरुन देय असलेले विविध दाखले देण्यात येणार आहे.

शुक्रवार, 4 ऑगस्ट, 2023 रोजी “जनसंवाद” कार्यक्रमात महसुल अदालतीचे आयोजन करुन प्रलंबित असलेली प्रकरणे, अपिले निकाली काढण्यात येणार आहे. तसेच सलोखा योजनेंतर्गत गावा-गावांतील व शेतातील रस्त्यांबाबत तलाठी, मंडल अधिकारीस्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याकरीता तलाठी कार्यालयांमार्फत शिबीरांचे आयोजन करण्यात येईल. तसेच जमिनविषयक आवश्यक असणाऱ्या नोंदी अद्यावत करण्याबाबत प्राप्त अर्जावर कार्यवाही करुन अर्ज निकाली काढण्यात येतील. तसेच “आपले सरकार” या पोर्टलवर प्राप्त तक्रारींची दखल घेऊन सदर तक्रारी निकाली काढण्यात येणार आहे.

शनिवार, 5 ऑगस्ट, 2023 रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी” या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या सीमावर्ती भागामध्ये तसेच अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे, महसूल कार्यालयांकडून निर्गमित होणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे मिळणेबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचा-यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही तसेच संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांना घरासाठी, शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे.

रविवार, 6 ऑगस्ट, 2023 रोजी ‘महसुल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यात महसूल संवर्गातील जिल्ह्यात कार्यरत असलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या सेवाविषयक बाबींचे समाधान करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सोमवार, 7 ऑगस्ट, 2023 रोजी ” महसूल सप्ताह सांगता समारंभ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यात महसूल यंत्रणेमार्फत या कालावधीत राबविलेल्या कार्यक्रमांची फलनिष्पत्ती व विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट, 2023 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या महसुल सप्ताहात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, सर्व घटकातील मान्यवर व्यक्ती तसेच विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून हा महसूल सप्ताह नियोजनपूर्व साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

COMMENTS