Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडवणीतील रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट; नगरपंचायत चे दुर्लक्ष ?

वडवणी प्रतिनिधी - वडवणी शहरात व वडवणी ते सालिंबा  मार्गावर खाजगी मालकांची जनावरे दिवस-रात्र रस्त्यावर मोकाट फिरत असल्यामुळे शहरातील वाहतुकीवर पर

पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात.
अंबाजोगाई शहराच्या पाणीपुरवठा विस्कळीत
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी

वडवणी प्रतिनिधी – वडवणी शहरात व वडवणी ते सालिंबा  मार्गावर खाजगी मालकांची जनावरे दिवस-रात्र रस्त्यावर मोकाट फिरत असल्यामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होत आहे.
पोलीस स्टेशन ने देखील या गुरांच्या मालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरातून वाहतूक करणारांची मागणी होत आहे. गुरांच्या मालकांना कुठल्याही प्रकारची भीती उरलेली नाही.कोणालाही न जुमानता दिवस-रात्र गुरे मोकाट सोडत आहेत. रस्त्यावर रात्रीच्या वेळी गुरे फिरत करत असल्यामुळे अनेक वेळा अपघात होऊन अनेक वाहनचालकांना जीव गमवावा लागला आहे. वडवणी कडून डाळिंबाकडे जाणारा रस्ता या ठिकाणी बुधवारी सकाळी  11 वाजत सुमारास एका मोटरसायकल वरून जाणार्‍या व्यक्तीला आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो . वडवणी शहरातील मेन रोड, बीड परळी रोड, वडवणी सालींबा रोड, रस्त्यासह प्रमुख गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर जनावरांचा कळप हा रोज च असतो. या मद्ये रस्ता सुरक्षतेबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे ? गाई, म्हशी,  या जनावरांचा या मद्ये समावेश आहे. नगरपंचायत ने वेळोवेळी लक्ष देऊन या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता वडवणी करांकडून होत आहे.

COMMENTS