पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात राबवण्यात येत असलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्या
पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात राबवण्यात येत असलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या फेरीत सुमारे 25 हजार 973 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, विशेष फेरीत पात्रता गुणांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे.
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेर्या झाल्या आहेत. त्यानंतर आता विशेष फेर्या राबवल्या जाणार आहेत. त्यानुसार पहिल्या विशेष फेरीसाठी 28 हजार 962 विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी पहिल्या दहा पसंतीक्रमानुसार 25 हजार 973 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. त्यात 19 हजार 682 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. दुसर्या पसंतीक्रमानुसार 3 हजार 424 विद्यार्थ्यांना, तर तिसर्या पसंतीक्रमानुसार 1 हजार 217 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. विज्ञान शाखेसाठी 14 हजार 134 तर वाणिज्य शाखेसाठी 9 हजार 47 विद्यार्थी आणि कला शाखेसाठी 2 हजार 154 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. विशेष फेरीत कला शाखेचा खुल्या गटासाठी सर्वाधिक पात्रता गुण 468 तर विज्ञान शाखेसाठीचे पात्रता गुण 464 आहेत. दोन्ही शाखांसाठी फर्ग्युसन महाविद्यालयाला पसंती मिळाली आहे. तर वाणिज्य शाखेचा सिम्बायोसिस महाविद्यालयात पात्रतागुण सर्वाधिक 447 आहेत. तिसर्या फेरीच्या तुलनेत विशेष फेरीच्या पात्रता गुणांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.
COMMENTS