नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कर्नाटकातील बंगळुरूमध्ये देशातील 26 राजकीय विरोधक पक्षांनी एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. मात्र या
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कर्नाटकातील बंगळुरूमध्ये देशातील 26 राजकीय विरोधक पक्षांनी एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. मात्र या बैठकीचा समाचार घेतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, कट्टर भ्रष्टाचारी असलेले पक्ष आपले तख्त वाचवण्यासाठी एकत्र आल्याची घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नीतीशकुमार, ममता बॅनर्जी, यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
अंदमान येथील पोर्ट ब्लेअर विमानतळावर नव्या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील काही राजकीय पक्ष जातीयवादाचे विष विकण्याचे काम करत आहे. तेच लोक आमच्याविरोधात बंगळुरुत बैठका घेताहेत. ही विरोधकांची बैठक नाही तर कट्टर भ्रष्टाचारी संमेलन आहे. कारण तिथे घराणेशाहीचे समर्थक एकत्र येत आहे. हे लोक कुटुंबासाठी भ्रष्टाचार वाढवत असून निवडणुका जवळ आल्यानेच यांनी दुकान उघडल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या बैठकीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवधी भाषेतील ’गाइत कुछ है’ ही कविता बोलून दाखवली. विरोधी पक्षाचे नेते गातात काही वेगळे, परिस्थिती वेगळी आहे. लेबल वेगळे आणि माल दुसराच आहे, विरोधक जनतेसाठी नाही तर स्वत:साठी काम करत असल्याचा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला आहे. माझ्याविरोधात एकत्र आलेल्या लोकांनी त्यांच्या चेहर्यावर मुखवटे लावलेले आहे. त्यांच्या स्वार्थी राजकारणामुळेच देशाचा विकास होत नाही. जनतेला या लोकांपासून सावध राहण्याची गरज असून यांना कुटुंब हेच प्राधान्य असल्याचे सांगत मोदींनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे.
COMMENTS