Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यवतमाळमध्ये अपघातात 4 जणांचा मृत्यू

यवतमाळ ः यवतमाळच्या करंजी मार्गावरील कोठोडा गावाजवळ वृत्तपत्र घेऊन जाणार्‍या एका व्हॅनला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला

मद्यधुंद मुख्याधिकार्‍यांनी उडवले दोन गाड्यांना
आसाममधील गुवाहाटी मध्ये रस्ता अपघातात ७ इंजिनियर विद्यार्थ्यांचा मृत्यू
भरधाव असलेल्या कारच्या धडकेत ऑटो चालकाचा मृत्यू

यवतमाळ ः यवतमाळच्या करंजी मार्गावरील कोठोडा गावाजवळ वृत्तपत्र घेऊन जाणार्‍या एका व्हॅनला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त व्हॅन वृत्तपत्र घेऊन पांढरकवडाकडे जात होती. रस्त्यात तिला हा अपघात झाला. यासंबंधीच्या माहितीनुसार, एका अज्ञात वाहनाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास ओमनी कारला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, त्यात कार चालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर व्हॅनला धडक देणार्‍या वाहनाने घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना त्याची कल्पना दिली.

COMMENTS