Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेहबूब पानसरे हत्याकांडातील आरोपी गजाआड

पूुणे: खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय तसेच जेजुरी नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व उद्योजक मेहबूब पानसरे यांची जमिनीच्

मणिपुरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा आगडोंब
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस प्रशासनाची भूमिका महत्वाची : पालकमंत्री दादाजी भुसे
रशियाचे चांद्रयान ‘लूना-25’ कोसळले

पूुणे: खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय तसेच जेजुरी नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व उद्योजक मेहबूब पानसरे यांची जमिनीच्या वादातून शुक्रवारी हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे जेजुरीमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान पानसरे यांच्या मारेकर्‍यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली.
वनीस प्रल्हाद परदेशी(रा. 404, गुरुवार पेठ, पुणे, मुळगाव रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी पुणे), महादेव विठठल गुरव ऊर्फ काका परदेशी (वय 65, रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी पुणे, मुळगाव मु. पो. वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना डेक्कन परिसरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचे निकटवर्तीय असलेले जेजुरीचे माजी नगरसेवक महेबूब पानसरे यांच्या खुनामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. जमिनीच्या वादातून खून करून पसार झालेल्या मारेकर्‍यांचा शोध पुणे ग्रामीण व पुणे शहर पोलिसांकडून सुरु होता. या आरोपींना डेक्कन परिसरातून पुणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलि निरीक्षक प्रताप मानकर यांच्या नेत्तृत्वाखाली खंडणी विरोधीपथकाकडून अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक मेहबूब पानसरे यांची शुक्रवारी कोयता आणि कुर्‍हाडीच्या साह्याने हत्या करण्यात आली होती. पानसरे यांची हत्या ही जमिनीच्या वादातून झाली. पानसरे यांनी जेजुरीजवळील नाझरे धरणाच्या परिसरात धालेवाडी येथे जमीन खरेदी केली होती. मात्र, जमिनीसंदर्भात वाद सुरू होते. त्यातच शुक्रवारी ते धालेवाडीत गेले असता या ठिकाणी वणेश प्रल्हाद परदेशी, किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी व इतर पाच जणांनी मेहबुब पानसरे व इतर दोघांवर कोयता, कुर्‍हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात पानसरेंच्या मानेला आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पुण्यात आणण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. मार्गदर्शनानुसार खंडणी विरोधी पथक-2, गुन्हेशाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलिस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, ईश्‍वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन अपाटे, प्रदीप गाडे, पवन भोसले यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचां डेक्कन परिसरातुन शोध घेवुन त्यांना पकडून, नमूद आरोपींकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांचा प्रत्यक्ष सहभाग निष्पन्न झाले. आरोपीतांनी त्यांचे इतर साथीदारासह वरील नमूद गुन्हा केला असल्याचे कबुली दिली अटक केली आहे. आरोपीना पुढील कारवाईसाठी जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

COMMENTS