Homeताज्या बातम्यासंपादकीय

वृध्द म्हणून संभावना करण्यापर्यंत घसरले ! 

 राजकारण आणि सत्ताकारण यांचे उद्दिष्ट समाजहिताचे नसेल तर काय गत होऊ शकते, याचं महाराष्ट्रात सलग दुसऱ्यांदा दिसलेलं उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग

स्वायत्त आयोगाचा पक्षपात ?
मनोज जरांगे पाटील : इव्हेंट मॅनेजमेंट की सत्ता संघर्ष ?
विजेचा वेग, चित्याची चपळता आणि वाऱ्याचा सळसळाट !

 राजकारण आणि सत्ताकारण यांचे उद्दिष्ट समाजहिताचे नसेल तर काय गत होऊ शकते, याचं महाराष्ट्रात सलग दुसऱ्यांदा दिसलेलं उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील फूट! सत्तेसाठी नैतिकता गमावलेल्या नेत्यांनी आज स्वतःला घुमारे फुटल्यासारखी खणखणीत भाषणे केली. अजित पवार,छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी तर आपल्या ज्या तडफेने एम‌ईटी मैदानावर भाषणे केली, ते पाहता सत्तेची चव काय असते, हे कळत होते.‌ मणिपूर मध्ये भाजपाच्या सत्तेला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा सत्कार केला जातोय, मग आम्ही कुठे चुकलो, असं म्हणणारे भुजबळ हे महात्मा फुले यांच्या विचारांना ढळढळीत काळीमा फासत होते. भाजप बरोबर आम्ही गेलो तर आमचं काय चुकलं, असा प्रश्न जाहीरपणे मंचावरून विचारत होते. असं विचारताना त्यांची जीभ थोडी जरी कचरली असती तरी महाराष्ट्रातील बहुजन समाज धन्य झाला असता. तीच गत धनंजय मुंडे यांचीही. यांना तर दादावर वेळोवेळी अन्याय झाल्याचे दु:ख मंत्रीपद मिळाल्यानंतर झाले! किती या बाणेदार निष्ठा म्हणाव्यात. तीच गोष्ट दादांची! त्यांनी मोठ्या साहेबांचा वयाचा दाखला देत राजकारणातून निवृत्त व्हा असा मोलाचा सल्लाच दिला.‌ विचारांची कोणतीही बांधिलकी नसलेल्या त्यांच्या पक्ष फुटीतून त्यांनी तर मुख्यमंत्री न केल्याचे दु:ख किती जिव्हारी असते, याचा कॅनव्हास मांडला! महाराष्ट्राची सत्ता हाता घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे मनोरंजन करण्याचा विडाच उचलला आहे, असे त्यांच्या भाषण कौशल्याला ऐकून ठामपणे म्हणावे लागेल. यातील सर्वात मोठे आक्रमण जे करण्यात आले ते म्हणजे शरद पवार यांच्या व्यक्तिमत्वावर! त्यांच्या बोटाला धरून आजपर्यंत ची राजकीय कारकीर्द साध्य केलेल्या पुतण्याने त्यांना ” कृतीशील वय संपूण गेल्याचे‌ सांगत थेट घरी बसण्याचा सल्ला दिला.‌ शरद पवार यांच्या समोर मनिमाऊ राहिलेल्यांना आज स्वतःच्या भाषणात वाघासारख्या डरकाळ्या वाटत असतील. खरं सांगायचं तर, त्यांच्या या डरकाळ्या म्हणजे मोदी सरकार समोर भिगी बिल्ली बनवलेल्यांची म्याव म्याव पलिकडे काही नव्हते. दुसऱ्या बाजूला त्यांचे साहेब असणारै शरद पवार यांचही भाषण झाले. भाषणात माहिर असलेल्यांनी कृतीविहीन होवून महाराष्ट्र काबीज केला आहे. खरेतर, महाराष्ट्राची प्रामाणिक मतदार असणाऱ्या जनतेशी या सगळ्यांनी गद्दारी केली आहे.  एका बाजूला भ्रष्टाचार केला म्हणून मोदींच्या मेहरबानीने तुरूंग नाकारून सत्तेत गेलेले हे नेते, लोकांना गृहीत धरतात.‌ लोकांनी कोणत्या विचारांनी तुम्हाला साथ दिली, याचा तुम्हाला किती सहज विसर पडला आहे, याचे प्रत्यंतर त्यांच्या भाषणातून येत आहे. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जनता अतिशय संवेदनशील आहे. आपल्याला फसवणाऱ्यांच्या जाळ्यात ही जनता येणार नाही. हा लोकनिर्धार नेत्यांच्या लक्षात आला आहे. पण, मराठीत एक नाटक आहे की, ” लक्षात कोण घेतो!” या नाटकाचा आशय नेत्यांचा तेव्हाच लक्षात येईल, जेव्हा, महाराष्ट्राची जनता मतदार म्हणून आपलं अस्तित्व २०२४ च्या निवडणूकांमध्ये दाखवून देईल. लोकहिताचा अथवा लोककल्याणाचा कोणताही अजेंडा नसलेली ही मंडळी आपल्यावरचे आरोप लपविण्यासाठी पुन्हा सत्तेसोबत गेले आहेत. ते पुन्हा जनतेची लूट करणारच नाहीत, याची शाश्वती कोण देतयं का! राष्ट्रवादी काँग्रेस च्या दोन्ही बाजूने होणारे आरोप-प्रत्यारोप हे केवळ मनोरंजन आहे.‌ आगामी लोकसभेच्या निवडणुका लागेपर्यंत है ‌राज्याच्या जनतेला सहन करावे लागणार आहे!

COMMENTS