Homeताज्या बातम्यादेश

एमएसपीसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक

दिल्ली-चंदीगड महामार्ग रोखत केले आंदोलन

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः सूर्यफूल पिकाच्या खरेदीमध्ये किमान आधारभूत किंमत (एमएसपी) न मिळाल्याने हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले असून सोमवारी त्यांनी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांमुळे सातारा शहरातील टँकरवाल्यांची दिवाळी सुरु
धारेश्‍वर दिवशी येथे गाईचे ढोहाळे जेवन कार्यक्रम थाटामाटात
सातारा जिल्ह्यातील पाच कारखान्यांकडून एफआरपी पूर्ण

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः सूर्यफूल पिकाच्या खरेदीमध्ये किमान आधारभूत किंमत (एमएसपी) न मिळाल्याने हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले असून सोमवारी त्यांनी सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर अतरून आंदोलन केले. त्यांनी कुरूक्षेत्रमध्ये केलेल्या आंदोलनाच्या वेळी दिल्ली-चंदीगड महामार्ग काही काळ रोखून धरला होता. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

कुरुक्षेत्रात शेतकरी नेते आणि प्रशासकीय अधिकारी, यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. चर्चा निष्फळ ठरल्यानंतर कुरुक्षेत्र जिल्ह्यातील पिपली गावात आयोजित ’महापंचायत’मध्ये शेतकर्‍यांनी राष्ट्रीय महामार्ग 44 रोखण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शेतकर्‍यांनी दिल्लीला जाणारा राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे.
गर्दी टाळण्यासाठी दिल्ली-चंदीगड मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. हरियाणातील शेतकरी सूर्यफूल पिकाच्या खरेदीत किमान आधारभूत किंमत ठरवण्याची मागणी कर आहेत. एमएसपीच्या अंमलबजावणीसाठी शेतकर्‍यांची निदर्शने सुरू आहेत. हरियाणा, पंजाब, यूपी आणि इतर शेजारील राज्यांतील शेतकरी नेते त्यांच्या मागणीसाठी ’एमएसपी दिलाओ, किसान बचाओ’ महापंचायतीसाठी पिपली धान्य मार्केटमध्ये जमले होते. यावेळी चर्चा निष्फळ ठरल्यामुळे शेतकरी कुरुक्षेत्रहून दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शनिवारी 8,528 शेतकर्‍यांना भावांतर भरपाई योजनेअंतर्गत 36,414 एकर क्षेत्रात घेतलेल्या सूर्यफूल पिकासाठी 29.13 कोटी रुपये वितरित केले. राज्य सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला बीबीवाय अंतर्गत सूर्यफूल पिकाचा समावेश करण्याची घोषणा केली होती. ही एक अशी योजना आहे, ज्याद्वारे सरकार चडझ खाली विकल्या गेलेल्या उत्पादनासाठी शेतकर्‍यांना निश्‍चित नुकसान भरपाई देते. एमएसपीपेक्षा कमी विकल्या जाणार्‍या सूर्यफूल पिकांसाठी राज्य सरकार अंतरिम मदत म्हणून प्रति क्विंटल रुपये 1,000 देत आहे. पण, राज्य सरकारने 6,400 रुपये प्रति क्विंटल या एमएसपीवर सूर्यफुलाची खरेदी करावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. याच मागणीसाठी यापूर्वी 6 जून रोजी कुरुक्षेत्रच्या शहााबादमध्ये शेतकर्‍यांनी निदर्शने केली होती. त्यानंतर पोलिसांनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज केला. गुरुनाम सिंग चधुनी यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांना अटक करण्यात आली. सध्या दिल्ली-चंदीगड महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले आहेत. येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. शांततेत आंदोलन सुरू असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

एमएसपी कायद्याची अंमलबजावणी करावी ः टिकैत – महापंचायतीला संबोधित करताना शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, सरकारने एमएसपी कायद्याची अंमलबजावणी करावी. सूर्यफुलावर एमएसपीची मागणी करणार्‍या शेतकरी नेत्यांची सुटका करावी. या मागण्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यापूर्वी शेतकरी आणि प्रशासन यांच्यात झालेल्या दोन फेर्‍यांच्या बैठकीत एकमत होत नसताना शेतकरी नेते महापंचायतीत सहभागी होण्यासाठी निघून गेले.

COMMENTS