मुंबई/प्रतिनिधी ः देशभरात प्रचंड तापमान वाढत असतांना, यापासून सुटका मिळवण्यासाठी मान्सून कधी सक्रिय होतो, याची सर्वचजण चातकासारखी वाट बघत असतांना
मुंबई/प्रतिनिधी ः देशभरात प्रचंड तापमान वाढत असतांना, यापासून सुटका मिळवण्यासाठी मान्सून कधी सक्रिय होतो, याची सर्वचजण चातकासारखी वाट बघत असतांना, मान्सूनची वाटचाल मंदावल्याचे समोर आले आहे. मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला असून, केरळमध्ये 4-5 तारखेला येण्याचा अंदाज होता, त्याचबरोबर महाराष्ट्रात 11- 12 जूनपर्यंत येण्याचा अंदाज होता, मात्र मान्सून संथ झाल्याचे दिसून येत आहे.
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, मालदीव, लक्षद्वीप क्षेत्र, संपूर्ण कोमोरिन क्षेत्र आणि दक्षिण आणि पूर्व-मध्य उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये वाटचाल केल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने शनिवारी दिली. या आठवड्याच्या शेवटी मान्सून केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित आहे. अन्यथा त्याचा पुढील प्रवास लांबण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये 10 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय भागात 5 जून रोजी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली पुढील 48 तासांत त्याच प्रदेशावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली पुढील 48 तासांत त्याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. म्यानमारच्या किनार्याजवळ पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर हे चक्रीवादळाचे परिवलन मध्यवर्ती स्तरावर असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, केरळमध्ये 5 जून रोजी आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर 3 ते 6 जून दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे पुढील 5 दिवसांत उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
COMMENTS