Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिखली येथे दारु चोरून विकणार्‍या इसमास अटक

9800रुपयाचा माल जप्त.

उस्माननगर प्रतिनिधी - उस्माननगर पोलिस स्टेशन च्या हद्दीत येणार्‍या मौजे चिखली ता.कंधार येथे  27/ मे रोजी अवैध देशी दारू चोरट्या मार्गाने विक्री क

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नागपूर उच्च न्यायालय वकील संघाच्या नवीन बार रूमचे उद्घाटन
चोपडा येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकान फोडून तीन लाखाचे चांदीचे दागिने चोरीला 
रेडी रेकनरचे १० ते १५ टक्के दरवाढ होणार असल्याच्या चर्चा निराधार : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उस्माननगर प्रतिनिधी – उस्माननगर पोलिस स्टेशन च्या हद्दीत येणार्‍या मौजे चिखली ता.कंधार येथे  27/ मे रोजी अवैध देशी दारू चोरट्या मार्गाने विक्री करताना आढळून आल्या प्रकरणी उस्माननगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.27 मे रोजी चिखली ता.कंधार येथे अवैध देशी दारू विक्री करताना देशी दारुचे दोन सीलबंद बॉक्स व एम एलच्या खुल्या (  40 ) चाळीस बॉटल्स असा एकूण 9800/ रुपयांचा माल आरोपी चंद्रकांत दिगंबर कदम वय (22 वर्ष ) रा. चिखली हा दारुची चोरट्यां मार्गाने विक्री करताना आढळून आले प्रकरणी सदरली आरोपी विरोधात पो.स्टे.उस्माननगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई  एपीआय भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय  पल्लेवाड , पोलीस अंमलदार जायभाये ,शिवपूजे व सुर्यवंशी यांनी केली आहे.
चौकट :-
 परिसरात ड्रा डे असताना दलाल चोरट्यां मार्गाने मुळ किमंत न घेता चढ्या भावाने विक्री करताना सरस प्रत्येकांना चर्चेत ऐकण्यात येते.त्यावेळेस त्यांच्यावर अंकुश ठेवणारे पथक काय करते असा सुर नागरिकांमध्ये निघत आहे.ऐरवी कमी किमतीत असणारी दारू त्या दिवशी चढ्या भावाने विक्री केली जाताना समजते याकडे सुध्दा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

COMMENTS