Homeताज्या बातम्यादखल

संघटक, मुत्सद्दी आणि प्रभावशाली सिद्धरामय्या !

कर्नाटक राज्याच्या नवनिर्वाचित विधानसभेत अखेर मुख्यमंत्री पदावर ओबीसी नेते सिद्धरामय्या यांचे नाव जाहीर झाले. काॅंग्रेसने जवळपास एकतर्फी यश संपाद

देणाऱ्याची झोळी दुबळी !
अंगणवाडी शिक्षिका : आंदोलन आणि प्रश्न !
तटस्थ निवडणूक आयुक्त निवड समितीचा पेच !

कर्नाटक राज्याच्या नवनिर्वाचित विधानसभेत अखेर मुख्यमंत्री पदावर ओबीसी नेते सिद्धरामय्या यांचे नाव जाहीर झाले. काॅंग्रेसने जवळपास एकतर्फी यश संपादन केलेल्या कर्नाटकाचा मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यात काही वेळ निश्चितपणे लागला असला, तरी, अशी बाब आवश्यक असते. सिद्धरामय्या हे ओबींसीं नेतृत्त्व जवळपास २००८ पासून काॅंग्रेसमध्ये आहे. २०१३ या वर्षात काॅंग्रेसला विधानसभेत यश मिळवून देणारे सिद्धरामय्या हे सलग पाच वर्षे कर्नाटकचे मुख्यमंत्री राहीले होते. अर्थात, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत देखील जेडीएस आणि काॅंग्रेस यांनाच सत्ता मिळाली होती. परंतु, दुसऱ्याच्या भरल्या ताटाला चोरून त्यावर ताव मारण्याचा कर्नाटक भाजपने केलेला डाव त्यांना असफलतेच्या शिखराकडे नेणारा ठरला. कर्नाटकात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. अर्थात लिंगायत हे सर्व जातीसमूहांचा भाग असला तरी त्यातील शेतकरी जातीच वरचढ आहेत आणि त्यामुळे वरचढ शेतकरी जातींच्या आसऱ्याखाली इतर जातींनाही लिंगायत समूहाला काही काळ भाजपने आपल्या कवेत ठेवले. परंतु, त्यांच्या सत्तेचा अनुभव ज्या पद्धतीने कर्नाटक जनतेने अनुभवला, त्यातून ते सावरलेच नाहीत; तर त्यांनी भाजपला अक्षरशः चारीमुंड्या चीत करण्याचा मनोदय आपल्या मतपेटीतून व्यक्त केला. मात्र, काँग्रेसला अभूतपूर्व मिळालेल्या यशानंतर काँग्रेस अंतर्गत नेमकं नेतृत्व कोणाकडे सोपवाव, हा प्रश्न महत्त्वाचा आणि अग्रणी ठरला. एका बाजूला डी. के. शिवकुमार सारखे अत्यंत आक्रमक आणि डॅशिंग नेतृत्व; ज्यांनी काँग्रेसला अतिशय विपरीत परिस्थितीतही सावरण्याचा प्रयत्न केला. तर, दुसऱ्या बाजूला, जनतेचा व्यापक पाठिंबा असलेले, उच्चशिक्षित असणारे आणि संघटक व मुत्सद्दी नेते त्याचबरोबर प्रशासनावर प्रभुत्व असलेले सिद्धरामय्या यांचे नेतृत्व एका बाजूला. या दोघांमध्ये सिद्धरामय्या यांच्या बाजूनेच पक्षश्रेष्ठी आणि पक्षाध्यक्ष यांचा कौल गेला. कारण सिद्धरामय्या हे निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा अप्रत्यक्ष चेहरा होते. सिद्धरामय्या यांच्या रूपाने काँग्रेसने ओबीसी नेतृत्वाची मुख्यमंत्रीपदी निवड केल्यानंतर कर्नाटकाचे राजकारण आता आणखी व्यापक पद्धतीने लोकसभेला दृष्टीपथास पडेल. तसे पाहिले तर सिद्धरामय्या हे एक संघटक नेते म्हणून कर्नाटकात लोकप्रिय आहेत. बऱ्याच प्रस्थापित माध्यमांनी त्यांच्या या यशाला जातीच्या पारड्यात पाहण्याचा किंवा मोजण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे. परंतु, सिद्धरामय्या यांचे कर्नाटकातील राजकारण हे सर्व जातीसमुहांचे संघटन करणारे आणि व्यापक असं नेतृत्व म्हणून सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर प्रशासनावर पकड असण्याची जी गरज मुख्यमंत्र्याला असते, त्यावर सिद्धरामय्या हे शंभर टक्के यशस्वी दिसतात. कारण यापूर्वी त्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा अनुभव घेतलेला आहे. त्यांची कामकाजाची पद्धत आणि प्रशासनाकडून काम करून घेण्याची पद्धत या दोन्हीही प्रभावशाली आहेत. ही बाब प्रशासनाला चांगली ठाऊक असल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात प्रशासन योग्य पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करेल, हे या निमित्ताने सांगता येईल. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होत असताना डी के शिवकुमार यांना देखील उपमुख्यमंत्री पदावर नियुक्त करून बहुदा राज्याचे गृहमंत्रीपदही त्यांच्याकडे दिले जाईल. त्यामुळे, या दोन्ही तुल्यबळ नेत्यांनी काँग्रेसला मिळवून दिलेल्या विजयाचा हा भाग लोकसभेतही त्याच पद्धतीने टिकून राहील, याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींनी निश्चितपणे केला आहे, हे या निर्णयावरून दिसून येते.

COMMENTS