Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेचा विनयभंग, पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल

कोपरगाव/प्रतिनिधी ः तालुक्यातील शहर पोलीस ठाण्याचा हद्दीत रहिवासी असलेल्या महिलेच्या घरात अनाधिकाराने घुसून तिला आरोपी महिलेच्या नवर्‍यासोबत अनैत

वाघोलीत डॉक्टरचा तरुणावर कोयत्याने हल्ला
दोन खुनाच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा (Video)
पती – पत्नीची एकत्रित आत्महत्या | loknews24 (Video)

कोपरगाव/प्रतिनिधी ः तालुक्यातील शहर पोलीस ठाण्याचा हद्दीत रहिवासी असलेल्या महिलेच्या घरात अनाधिकाराने घुसून तिला आरोपी महिलेच्या नवर्‍यासोबत अनैतिक संबध असल्याच्या कारणारून काठीने लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आरोपी सोमनाथ पावसे, रवी पावसे, ज्योती पावसे, आदी पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी महिला हि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असून तिचे आरोपी महिलेच्या नवर्‍यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आहे.त्या संशयावरून आरोपी सोमनाथ पावसे,रवी पावसे,ज्योती पावसे,रा.हिवरगाव ता.संगमनेर,नीलिमा लोहकणे,वैष्णवी लोहकणे रा.कोकमठाण आदी पाच आरोपीनी शनिवार दि.13 मे रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन एका आरोपी महिलेच्या नवर्‍याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून काठी व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले असून शिवीगाळ करून करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.तर सोमनाथ पावसे याने फिर्यादी महिलेच्या अंगावरील साडी सोडून फिर्यादी सोबत अश्‍लील हावभाव करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मध्य रात्री उशिरा धाव घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.231/2023 भा.द.वि.कलम 354,324,323,504,506,143,147,148,149 अन्वये पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

COMMENTS