Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे पुस्तक महोत्सवात विक्रमी विक्री

तब्बल 11 कोटी रुपयांची उलाढाल

पुणे : पुण्यातील पुस्तक महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, या महोत्सवात विक्रमी पुस्तकांची विक्री झाली आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयो

सातारा जिल्ह्यात निवडणूकीचे वारे; जिल्हा बँकेच्या निमित्ताने व्ह्यूरचनेस प्रारंभ
असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी विधी सेवा महाशिबिराचे आयोजन
महाराष्ट्राच्या वीज उद्योगाचे खाजगीकरण थांबविण्यासाठी बेमुदत संप

पुणे : पुण्यातील पुस्तक महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, या महोत्सवात विक्रमी पुस्तकांची विक्री झाली आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसादामुळे या महोत्सवात पुस्तकांच्या साडेआठ लाख प्रतींची विक्री झाली असून, सुमारे 11 कोटींची उलाढाल या महोत्सवात झाली. त्यामुळे पुस्तके आणि वाचनाशी संबंधित चार विश्‍वविक्रम नोंदवलेल्या या महोत्सवात पुस्तक विक्रीची उच्चांकी ठरली.
 राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव झाला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते प्रवीण तरडे, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विजय खरे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप झाला. या महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यविषयक चर्चांना पुणेकरांनी उत्स्फूर्त हजेरी लावतानाच मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदीही केल्याचे स्पष्ट झाले. पुणे पुस्तक महोत्सवाला सुमारे साडेचार लाख नागरिकांनी महोत्सवाला भेट दिली. पुस्तक विक्रीतून सुमारे 11 कोटींची आर्थिक उलाढाल झाली. त्यामुळे पुढील वर्षीही हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाला भेट देणार्‍या, पुस्तक खरेदी करणार्‍यांत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. महोत्सवात नरेंद्र मोदी लिखित एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाच्या 87 हजार प्रती, तर शिवराज्याभिषेक या पुस्तकाच्या 69 हजार प्रती वितरित करण्यात आल्या. पुणे हे पुस्तकांची राजधानी होण्यासाठी महापालिकेबरोबर प्रयत्न केले जातील. तसेच वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी एनबीटीचे पुण्यात केंद्र स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे म्हणाले.

COMMENTS