Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामसेवक हा जनता आणि प्रशासनातील दुवा!- पालकमंत्री दादाजी भुसे

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

नाशिक: जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने आदर्श ग्रामसेवक, आदर्श विस्तार अधिकारी ग्रामपंचायत याचा पुरस्कार वितरण सोहळा हा जिल्ह्याचे

सावता परिषदेने अरण विकास प्रश्नाला वाचा फोडली-कल्याण आखाडे
उदयनराजेंच्या गाण्यावर सातारकर फिदा
जन्मदात्याकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक: जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने आदर्श ग्रामसेवक, आदर्श विस्तार अधिकारी ग्रामपंचायत याचा पुरस्कार वितरण सोहळा हा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागात ग्रामसेवक हा जनता व प्रशासन यांच्यातील दुवा असतो. पातळीवर ग्रामसेवक हा १५५ योजना या राबवत असतो. या योजना राबवणे आव्हानात्मक असले तरी लोकसेवक म्हणून ही सगळ्यात मोठी संधी देखील आहे. आधी जिल्ह्यात बऱ्याच गावांमध्ये या ग्रामसेवकाची बदली करा अशी ओरड असे परंतु आता चांगलं काम करणा-या ग्रामसेवकांची बदली करू नका असे देखील नागरिक म्हणतात ही ग्रामसेवकांच्या कामाची पावती आहे. ग्रामसेवकांनी गावात सर्व योजनांची प्रभाविपणे अंमलबजावणी करत पुढील काळात महाराष्ट्रात नाशिक जिल्हा हा क्रमांक एकवर आणावा, ग्रामीण भागात काम करताना कोणत्याही प्रकारच्या चांगल्या सूचना असतील तर त्यादेखील प्रशासनापर्यंत पोहचवाव्यात असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या बताने १२७ मोडल स्कूल विकसित करण्यात येत असून या शाळा देखील महाराष्ट्रात आदर्श आदर्श ठरतील असा विश्वास व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आशिमा मित्तल यांनी आपल्या मनोगतात पुरस्कार्थी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे देखील अभिनंदन केले, ग्रामपंचायत विभागाने अतिशय कमी काळात गत ५ वर्षातील सर्व आदर्श ग्रामसेवकांचा गुणगौरव सोहळा हा एकत्रितरित्या आयोजित केल्याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह ग्रामपंचायत विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले, पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांचा आदर्श हा उपस्थित सर्व ग्रामसेवकांनी घेत आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करावा तसेच आपले साथ मॉडेल व्हिलेज म्हणून विकसित करण्यासाठी नवनवीन संकल्पना आमलात आणाव्या, ग्रामसेवकांनी स्वतः तंत्रस्नेही होते तंत्रज्ञानाचा वापर हा गावाच्या विकासासाठी करावा, पुढील काळात आपल्या गावात पाण्यासंदर्भात कुठलीही समस्या निर्माण होणार याची काळजी ग्रामसेवकानी घ्यावी असे आवाहन देखील मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

प्रास्ताविकात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी कारांना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आदर्श ग्रामसेवक कार्यक्रम हा घेता आला नसल्याने गत ५ वर्षांचे पुरस्कार वितरणाचे आयोजन एकत्रितरित्या करण्यात आल्याचे सांगितले. ग्रामसेवक हे गावात प्रत्येक योजना कशी राबवता येईल यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे गावाच्या विकासासाठी ग्रामसेवकांचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे त्याच कटिबद्धतेबद्दल आदर्शवत काम करण्या-या ग्रामसेवकांचा हा गौरव सोहळा आहे. प्रत्येक ग्रामसेवकाने या पुरस्कारार्थी ग्रामसेवकांचा आदर्श घेत काम करावे. असे सांगितले. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ५ आदर्श ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रयाण पाटील, कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे, पंकज मेतकर यांच्यासह सर्व तालुक्याचे गट विकास अधिकारी, ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम, राज्य सचिव सूचित घरत, जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे, सरचिटणीस रवींद्र शेलार यांच्यासह ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन पवार व ज्योती केदारे यांनी केले.

COMMENTS