Homeताज्या बातम्याक्रीडा

पंजाब किंग्जच्या विजयामुळे प्लेऑफसाठी चुरस वाढली

दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

नवी दिल्ली/प्रतिनिधी : आयपीएल 2023 मधील 59 वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघात खेळली गेला. या सामन्यात पंजाबने दिल्लीचा 31 धावांनी पर

कुस्तीपटू आणि पोलीसांमध्ये धक्काबुक्की
‘बीसीसीआय’ वर्षाला 19 अब्ज कमावणार, इतर देशांचा होतोय जळफळाट
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून दीपक चहरची माघार ?

नवी दिल्ली/प्रतिनिधी : आयपीएल 2023 मधील 59 वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघात खेळली गेला. या सामन्यात पंजाबने दिल्लीचा 31 धावांनी पराभव केला. या विजयामुळे अंतिम चारमध्ये पोहचण्यासाठी स्पर्धेत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले होते. कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सात गडी गमावून 167 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 136 धावाच करू शकला. नाणेफेक हरल्यानंतर पंजाबसाठी सुरुवात खास नव्हती. कर्णधार शिखर धवन पहिल्याच षटकातच इशांत शर्माचा बळी ठरला. यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनही स्वस्तात बाद झाला. पण सलामीला उतरलेला प्रभसिमरन सिंग 19व्या षटकापर्यंत क्रीझवर राहिला. त्याने 65 चेंडूत 103 धावांची शानदार खेळी केली आणि आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. त्याच्या खेळीमुळे पंजाब किंग्जने 20 षटकांत 7 गडी गमावून 167धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला डेव्हिड वॉर्नर आणि फिल सॉल्टने शानदार सुरुवात करून दिली. काही काळ दिल्ली हा सामना एकतर्फी जिंकेल असे वाटत होते. वॉर्नरनेही अर्धशतक झळकावले. पण हरप्रीत ब्रारने चार विकेट घेत दिल्लीच्या सर्व आशा धुळीस मिळवल्या. त्यामुळे दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दिल्लीच्या संघाला निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 136 धावा करता आल्या. पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले, तर दिल्लीचा संघ या पराभवानंतरही शेवटच्या स्थानावर आहे. त्यांना 12 व्या सामन्यात आठव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या सर्व आशाही संपल्या आहेत. दुसरीकडे, पंजाब किंग्सने शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे. पंजाबचा बाराव्या सामन्यातील हा सहावा विजय ठरला. गुणतालिकेत संघ 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. तरीही संघाने उर्वरित दोन्ही सामने जिंकले आणि नेट रनरेट चांगला राहिल्यास अंतिम-4 मध्ये जाण्याच्या त्याच्या आशा कायम राहतील.

COMMENTS