Breking : पेट्रोल २ रुपये ८० पैसे, डिझेल १ रुपये ४४ पैशांनी स्वस्त : राज्य सरकारचा निर्णय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Breking : पेट्रोल २ रुपये ८० पैसे, डिझेल १ रुपये ४४ पैशांनी स्वस्त : राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनु

खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
दहावी-बारावीचे सुधारित वेळापत्रक जाहीर
नववीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई : केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.

COMMENTS