Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कळमआंबा ग्रामपंचायतने घेतला एकमताने दारूबंदीचा ठराव

कळमआंबा येथील महिलेने दारूबंदी साठी मोठ्या संख्येने घेतला पुढाकार

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील कळमआंबा येथील ग्रामपंचायत कडून गावातील महिलांच्या आग्रही मागणीवरून अवैद्य दारू विक्री व दारुबंदीचा ठराव बहुमताने

युद्ध नको : युक्रेनचा युवक आणि रशियाच्या तरूणीचा संदेश
राष्ट्रवादीने कायम पाण्याबाबत भेदभाव केला : राम शिंदे
मोदी सरकारच्या 24 मंत्र्याविरोधात आहेत गंभीर गुन्हे

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील कळमआंबा येथील ग्रामपंचायत कडून गावातील महिलांच्या आग्रही मागणीवरून अवैद्य दारू विक्री व दारुबंदीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. सूचक ग्रामपंचायत सदस्या तेजस्वी ताई राणू हिरवे व ग्रामपंचायत सदस्या शोभा ताई सतीश घाडगे यांनी अनुमोदन दिले.व सर्व महिला व सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी ठराव बहुमताने पारित केला.यावेळी सरपंच शशिकांत इंगळे,यांच्यासह ग्रा पं सदस्य उपस्थित होते. या निर्णयामुळे गावात दारूमुळे होणारे दुष्परिणाम नुकसान होणार नाही.महिलांचा ठराव मंजूर केल्याबद्दल महिलांनी या निर्णयाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले.

COMMENTS