Homeताज्या बातम्यादेश

काँगे्रसची ‘नारी न्याय गॅरंटी’ योजनेची घोषणा

महिलांना दरवर्षी मिळणार 1 लाख रुपये

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच राजकीय पक्षांकडून आश्‍वासने देण्यात येत असून, काँगे्रसने बुधवारी महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्

दुधाचा टॅंकर पलटी, हजारो लिटर दुधाची नासाडी
जय जय महाराष्ट्र माझा’ गाण्याला राज्यगीताचा दर्जा
मुंबई विमानतळावर 33.60 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच राजकीय पक्षांकडून आश्‍वासने देण्यात येत असून, काँगे्रसने बुधवारी महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी नारी न्याय गॅरंटी योजनेची घोषणा केली आहे. यासोबतच आणखी 5 महत्वाच्या घोषणा काँगे्रसने केल्या आहेत. नारी न्याय गॅरंटी योजनेच्या माध्यमातून महिलांना दरवर्षी 1 लाख रूपयांचा लाभ मिळणार आहे. काँग्रेसने गरीब महिलाओं, आशा, आंगणवाडी सेविका, मीड डे मील वर्कर्स यांच्यासोबतच नोकरी करणार्‍या महिलांसाठी ही योजना बनवली आहे. त्याचबरोबर गावातील महिलांमध्ये कायद्याबाबत जागरुकता होण्यासाठी महिला मैत्रीची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, महिला देशाची निम्मी लोकसंख्या आहे. मात्र त्यांना गेल्या 10 वर्षात काहीच मिळाले नाही. त्यांच्या नावावर केवळ राजकारण झाले व त्यांची मते मिळवली गेली. काँग्रेस आज ’नारी न्याय गॅरेंटी’ची घोषणा करत आहे. काँगे्रसने महालक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे. यानुसार गरीब कुटूंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी कुटूंबातील एका महिलेला वार्षिक 1 लाख रुपये देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. या माध्यमातून सत्तेत आल्यानंतर काँग्रेसकडून केंद्र सरकारमधील सर्व नव्या भरती प्रक्रियेत निम्म्या जागा महिलांसाठी आरक्षित केल्या जातील. यासोबतच शक्तीचा सन्मान म्हणून आणखी एक योजना काँगे्रसने आणली असून, यामध्ये  काँग्रेसने आपल्या योजनेत आशा वर्कर, आंगणवाडी कार्यकर्ता तसेच मिड डे मील बनवणार्‍या महिलांसाठी विशेष घोषणा केली आहे. शक्तिचा सन्मान अंतर्गत या महिलांच्या वेतनात केंद्र सरकारचे योगदान दुप्पट केले जाईल. यासोबतच अधिकार मैत्री या योजने अंतर्गत अधिकार मैत्री अंतर्गत सर्व पंचायतींमध्ये एक अधिकार मैत्री नियुक्त केली जाईल. या गावातील महिलांना कायदेशीर अधिकारांची माहिती देईल आणि अधिकार लागू करण्यात मदत करतील. तसेच सावित्रीबाई फुले हॉस्टेल योजने अंतर्गत काँग्रेसने नोकरी करणार्‍या महिलांबाबतही मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, केंद्र सरकार देशात नोकरी, व्यवसाय करणार्‍या महिलांसाठी वसतीगृहांची संख्या दुप्पट करेल. प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक तरी महिला वसतिगृह असेल.

COMMENTS