Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयंती उत्सवातून कृतीशील विचार रुजले पाहिजेत-डॉ.हनुमंत सौदागर

केज प्रतिनिधी - डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित ,उपेक्षित घटकांना प्रवाहात आणण्यासाठी जीवन वेचले. त्यांचे विचार घेऊन देश महासत्ता होईल असे मत डॉ ह

पुणे जिल्ह्यातील बँकेवर भरदिवसा दरोडा
लोकलमध्ये लेडीज डब्यात साप
रात्रशाळेबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करणार – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

केज प्रतिनिधी – डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित ,उपेक्षित घटकांना प्रवाहात आणण्यासाठी जीवन वेचले. त्यांचे विचार घेऊन देश महासत्ता होईल असे मत डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले. ते डोका येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपीनाथ ईनकर, प्रमुख उपस्थिती रामराव भांगे,माजी सरपंच रमेश भांगे ,माजी सरपंच बापूराव भांगे ,माजी सरपंच चंपाबाई इनकर,  ग्रा पं सदस्य नानीबाई इनकर,,डॉ बळीराम इनकर प्रा विक्रम इनकर  जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रणवीर (बंडू) इनकर आदींची होती. महापुरुषांची वाटणी केली जाऊ नये.ते सर्वांचेच असतात.त्यांना डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घेतले पाहिजे.विचार आत्मसात केले पाहिजेत असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विक्रम इनकर यांनी केले. आभार डॉ बळीराम इनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीने परिश्रम घेतले.

COMMENTS