Homeताज्या बातम्यादेश

विकसित भारत घडवण्याचा काळ – राष्ट्रपती मुर्मू

देशाला 2047 पर्यंत आत्मनिर्भर बनवायचा निर्धार

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः सध्याच्या काळ देशासाठी सुवर्णकाळ असून, आपल्याला देशाला 2047 पर्यंत आत्मनिर्भर बनवायचे आहे. ही 25 वर्ष आपल्या सर्वांसाठी आण

मणिपूरच्या घटनेने व्यवस्थेला चपराक
आंबेडकर जयंती मिरवणुकीत दगडफेक, पाच पोलिस जखमी
केळी उत्पादक शेतकऱ्यांना भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा : कृषीमंत्री दादाजी भुसे

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः सध्याच्या काळ देशासाठी सुवर्णकाळ असून, आपल्याला देशाला 2047 पर्यंत आत्मनिर्भर बनवायचे आहे. ही 25 वर्ष आपल्या सर्वांसाठी आणि देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या कर्तव्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असून, विकसित भारत घडवण्याचा हा काळ असून, देशातील प्रत्येक नागरिक यात सहभागी होईल, असा आशावाद राष्ट्रपती द्रोैपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.

संसदेच्या या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतांना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, मला आनंद होत आहे. काही महिन्यांपूर्वीच देशाने आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण करून ’अमृतकाल’मध्ये प्रवेश केला. अमृतकालचा 25 वर्षांचा काळ हा स्वातंत्र्याचे सुवर्ण शतक आणि विकसित भारत घडवण्याचा काळ आहे. आपल्यासमोर एक युग निर्माण करण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला 100 टक्के क्षमतेने काम करावे लागेल, असे आवाहन देखील राष्ट्रपती मुमूर्र् यांनी केले. मंगळवारपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून, पहिल्यांदाच संसदेला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत याचा उल्लेख केला आहे.

62 मिनिटे चाललेल्या आपल्या भाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतात प्रबळ इच्छाशक्ती असलेले सरकार आहे. हे सरकार न घाबरता काम करत आहे. यासाठी त्यांनी सर्जिकल स्ट्राईक, दहशतवादावरील कठोरता, कलम 370 आणि तिहेरी तलाकचा उल्लेख आवर्जून केला.सरकारला सलग दोन संधी दिल्याबद्दल मुर्मू यांनी जनतेचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, आपल्याला एक असा आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे की जिथे गरिबी नाही आणि मध्यमवर्ग समृद्ध आहे. गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू ठेवण्याबाबतही त्यांनी सुतोवाच केले. त्यांनी 11 कोटी छोट्या शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी 2.25 लाख कोटी रुपयांच्या सन्मान निधीचाही उल्लेख केला.

तरुणांनी काळाच्या दोन पावले पुढे असले पाहिजे – आपल्याला 2047 पर्यंत असे राष्ट्र घडवायचे आहे, ज्यात भूतकाळाचे वैभव आहे आणि आधुनिकतेचा प्रत्येक सुवर्ण अध्याय आहे. आपल्याला स्वावलंबी भारत बनवायचा आहे. जो मानवी जबाबदार्‍या पार पाडण्यास सक्षम आहे. तरुणांनी काळाच्या दोन पावले पुढे असले पाहिजे.सरकार काही महिन्यांत 9 वर्षे पूर्ण करेल. या 8 वर्षांत भारतातील जनतेने सकारात्मक बदल पाहिले. आज प्रत्येक भारतीयाचा आत्मविश्‍वास अधिक बळावला आहे. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी आपण जगावर अवलंबून होतो, आज जगाचे प्रश्‍न सोडवत आहोत. आज जगाच्या पटलावर आपण आधुनिक पायाभूत सुविधा तयार करु शकतो. आज भारतात डिजिटल नेटवर्क आहे, ज्यातून विकसित देशही प्रेरणा घेत आहेत. त्यामुळे वेगवान विकासाच्या प्रगती पथावर भारताने पाऊल ठेवले आहे.

जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा ः पंतप्रधान मोदी
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून, त्यापूर्वी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आजचा दिवस महत्त्वाचा आहे. राष्ट्रपती मुर्मू पहिल्यांदाच संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करत आहेत. या सभागृहात वाद होतील, वाद व्हायलाही हवेत. विरोधक पूर्ण तयारीनिशी आले आहेत. आम्ही खूप चांगले मंथन करून देशासाठी अमृत काढू. आपल्या देशाचा अर्थसंकल्प जग पाहत आहे. या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. जग आपल्या देशाकडे आशेने पाहत आहे.

COMMENTS