केदारनाथ : चारधाम यात्रेतील एक असलेल्या केदारनाथ मंदिरातील दरवाजे सहा महिन्याच्या शीतकालीन कालावधीनंतर मंगळवारी सकाळी उघडण्यात आली. या क्षणाचे औच
केदारनाथ : चारधाम यात्रेतील एक असलेल्या केदारनाथ मंदिरातील दरवाजे सहा महिन्याच्या शीतकालीन कालावधीनंतर मंगळवारी सकाळी उघडण्यात आली. या क्षणाचे औचित्य साधत मंदिराला तब्बल 20 क्विंटल फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली होती. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमीत सिंह यांसह सुमारे आठ हजार भाविक उपस्थित होते.
भारतात 12 ज्योतिर्लिंगांना विशेष महत्त्व आहे. चारधाम यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. संपूर्ण जगात 11 वे ज्योतिर्लिंग म्हणून ख्याती असणार्या भगवान केदारनाथांच्या मंदिराची कवाडं (दरवाजे) मंगळवारी सकाळी परंपरागत पूजा-अर्चा पार पडण्यानंतर उघडण्यात आली. यावेळी आठ हजार भाविक उपस्थित होते. उत्तराखंडची चारधाम यात्रा 22 एप्रिलपासून सुरू झाली आहे. 22 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचा दरवाजा उघडण्यात आला. तर 27 एप्रिलला बद्रिनाथ धामचा दरवाजा खुला केला जाणार आहे. खरंतर केदारनाथ मंदिर 22 एप्रिल म्हणजेच अक्षय्य तृतीयेलाच खुलं होणार होते. मात्र प्रचंड बर्फवृष्टी आणि पावसामुळे तारखेत बदल करण्यात आली. दुसरीकडे हवामान खात्याने 29 एप्रिलपर्यंत बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उत्तराखंड सरकारने रविवारी केदारनाथसाठी भाविकांची नोंदणी 30 तारखेपर्यंत थांबवली. ऋषिकेश, गौरीकुंड, गुप्तकाशी आणि सोनप्रयागसह अनेक ठिकाणी यात्रेकरूंना सध्या तिथेच थांबण्यास सांगितले जात आहे.
COMMENTS