Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आर्ट ऑफ लिव्हींगची श्री श्री रविशंकर बीड परिवाराकडून सुदर्शन क्रिया शिबिराचे आयोजन

बीड प्रतिनिधी- आर्ट ऑफ लिव्हिंगची जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया या शिबिराचे आयोजन बीडमध्ये करण्यात आले आहे. सुदर्शन क्रियामुळे तणावरहीत मनासाठी शिबि

विरोधाची एकजूट : पर्याय आणि अडचणी !
राज्यात भारनियमनचा शॉक | DAINIK LOKMNTHAN
तीनच पर्याय !

बीड प्रतिनिधी- आर्ट ऑफ लिव्हिंगची जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया या शिबिराचे आयोजन बीडमध्ये करण्यात आले आहे. सुदर्शन क्रियामुळे तणावरहीत मनासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये म्युझीक, मस्ती, धमाल, योग, ध्यान, प्राणायाम असा जल्लोष आहे.महत्वाचे म्हणजे सुदर्शन क्रिया जगातील 172 देशामध्ये करोडो लोकांनी याचा अनुभव घेतला आहे. सुदर्शन क्रिया ही जागतिक आरोग्य संघटना (थकज) मान्यता प्राप्त आहे. यामुळे मानसिक तणावरहित मन, आरोग्य संपन्न, निर्णयक्षमता, तरुणांना अभ्यासामध्ये एकाग्रता,आंतरिक शक्तीचा अनुभव, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच मानसिक आजार, बी.पी.,कोलेस्टेरॉल मध्ये संतुलन, रोगप्रतिकारक शक्ती मध्ये वाढ, शुगर, कंबर दुखी, पाठदुखी, सांधेदुखी यासाठी सुदर्शन क्रिया फायदेशीर ठरते. या शिबिरासाठी बंगलोर प्रशिक्षित मास्टर ट्रेनर विश्वनाथ गडकर व नवनिर्वाचित शर्मिलाताई काळे यांच्या सानिध्यात होणार आहे. हे शिबिर दि.25 एप्रिल 2023 ते 29 एप्रिल 2023 दरम्यान  सायंकाळी 6 ते 9 या वेळेत गुरुनानक दरबार, श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ, स्टेडियम रोड, बीड येथे होणार आहे. तरी बीडमधील सर्वांना आर्ट ऑफ लिव्हींग आनंद अनुभुती शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त आर्ट ऑफ लिव्हींग परिवार यांनी केले आहे.

COMMENTS