Homeताज्या बातम्यामनोरंजन

नागराज मंजुळेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

मी पुन्हा जन्माला आलो तर पहिलवानच होईन अन् असलंच अजून एखादं पदक माझ्या भारताला मिळवून देईन,’ असं म्हणणारा लाल मातीतला पैलवान म्हणजे ऑलिंपिक पदकवी

देवदर्शन करुन परत येत असताना अपघात, तिघांचा मृत्यू
संभाजीनगरमध्ये 39 लाखांची रोकड जप्त
पुण्यात पुन्हा हिट अँड रन; पोलिसाचा मृत्यू

मी पुन्हा जन्माला आलो तर पहिलवानच होईन अन् असलंच अजून एखादं पदक माझ्या भारताला मिळवून देईन,’ असं म्हणणारा लाल मातीतला पैलवान म्हणजे ऑलिंपिक पदकवीर खाशाबा जाधव, देशासाठी पहिलं आंतरराष्ट्रीय पदक मिळवणारा लाल मातीतला मराठी माणूस. कुस्तीच्या क्षेत्रात भारताचं नाव सर्वप्रथम जगात झळकवणारा महाराष्ट्रपुत्र. या महाराष्ट्रपुत्राची संघर्षकहानी आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. कोल्हापुरातील कुस्तीच्या मैदानातून नागराज यांनी ही घोषणा केली आहे. आता या सिनेमाची चाहत्यांना आणि कुस्तीप्रेमींना उत्सुकता आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवर प्रभावी मांडणी करत प्रेक्षकांना सजग करणारे चित्रपट तयार करण्यात नागराजची ओळख आहे.

नागराज मंजुळे म्हणाले, “खाशाबा जाधव हे जागतिक किर्तीचे आणि दर्जाचे पैलवान होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच मी यासंदर्भात माहिती देईल. या सिनेमाचं शूटिंगदेखील कोल्हापुरात होऊ शकतं. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तो काळ अनुभवायला मिळणार आहे”

COMMENTS