शिर्डी/प्रतिनिधी ः शहर व परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार गारांच्या अवकाळी पावसाने द्राक्ष कांदा मका आंबा डाळिंब व गहू या पिकांचे मोठ्या
शिर्डी/प्रतिनिधी ः शहर व परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार गारांच्या अवकाळी पावसाने द्राक्ष कांदा मका आंबा डाळिंब व गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्यावर आर्थिक संकट कोलमडले आहे. मागची नुकसान भरपाई मिळणे बाकी असतानाच पुन्हा गारपिटीने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करून शेतकर्याला मोठा धक्का दिला आहे. आता तरी शासन जागा होऊन त्वरित मदत देईल की नाही हीच चिंता आता शेतकर्यांना भेडसावत आहे आता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कृपेने हिसकावून घेतल्याने हा गारपिटचा पाऊस शेतकर्यांसाठी भस्मासुर ठरला. गेल्या काही वर्षापासून बळीराजावर निसर्गाची अवकृपा आहे.
अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला असताना अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुका त्याला अपवाद ठरेल अशी चर्चा शेतकरी बांधवांमध्ये होती, परंतु ती चर्चा फोल ठरली असून रविवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास जोरदार वादळी वार्यासह सुरू झालेल्या गारपिटीच्या पावसाने शेतकर्यांसह व्यापारी नागरिक सर्वांची दाणादाण उडून गेली. शेतातील सोंग ठेवलेली पिके तसेच द्राक्ष बागा कांदा हे पीक या गारपीटीत होत्याचे नव्हते होऊन भुईसपाट झाले. भाव मिळेल या अपेक्षेने व्यापार्यांशी सौदा राहिलेले द्राक्ष बाग पूर्णता या गारपिटीने झोडपून निघाल्याने उध्वस्त झाले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना अगदी हातात तोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत उध्वस्त झाल्याने मोठा मानसिक धक्का व आर्थिक फटका बसला आहे. हीच अवस्था डाळिंब तसेच आंबा फळबाग शेतकर्यांची झाली. मागास असलेला गहू काढण्यासाठी शेतात उभा होता. या गावावर सुद्धा या सुलतानी संकटाने आक्रमण करून शेतकर्याला जिरे सांडले. पशुधनासाठी राखून ठेवलेला मका व इतर हिरवा चारा याकडेही अवकाळी पावसाची वक्रदृष्टी झाल्याने चारा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. मका पिकाची पाने मोठ्या प्रमाणात घडली गेल्याने नुकसान झाले आहे. सुमारे अर्धा तास चाललेल्या या गारपिटीच्या जोरदार पावसाने शेतकर्याची पुरती धांदल उडून गेली. मागील अतिवृष्टीत अनेकांची नुकसान भरपाई येणे बाकी असताना तसेच काही तांत्रिक कारणास्तव नुकसान होऊनही अनेकांना नुकसान भरपाई मिळण्यात अपात्रतेला सामोरे जावे लागले. त्यात आता नव्याने पुन्हा गारपिटीने शेतकर्याला मोठा आर्थिक फटका दिला आहे. अनेकांनी उसनवारी तसेच घरातील मौल्यवान दागिने मोडून या हंगामातील पिके घेतली होती, परंतु अचानक झालेल्या गारपिटीने सर्वच पिकांचा बळी घेऊन टाकला. गारपीट सुरू झाल्यानंतर काही क्षणात रस्ते निर्मनुष्य झाले होते. लहान मुले तसेच अनेक महिला पुरुषांनी या अवकाळी गारपिटीच्या पावसाचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये करून गारांचा सडा सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. राहता शहरासह परिसरातील ज्या ज्या गावांमध्ये गारांचा पाऊस झाला त्या गावात रस्त्यांवर गारांचा खर्च पडला होता गारांचा खर्च पडला होता.
COMMENTS